
स्पर्धा करायचीच तर विकासाची करा, घाण राजकारण सोडा ! : गुलाबराव पाटील
धरणगाव (जि. जळगाव) : शहराच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा असणारी पाणीपुरवठा योजना (Water supply scheme) सुरू होत आहे. यामुळे शहरवासीयांना मुबलक पाणी मिळणार आहे. यावर टीका करणारे तोंडघशी पडले असून, त्यांनी स्पर्धा करावी, मात्र ती विकासकामांची करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मंगळवारी (ता. १०) येथे केले. (If you want to compete do development leave dirty politics Gulabrao Patil statement Jalgaon news)
येथे तब्बल २७ कोटी ४४ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या योजनेच्या माध्यमातून इतिहासात पहिल्यांदाच शहरातील सर्व जलवाहिन्या बदलण्यात येणार असून, दोन भव्य जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे यासाठी पालिकेवर १० टक्के रकमेचा पडलेला भारही आपण शासनाकडून अन्य योजनेतून मंजूर करून आणू, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. विरोधकांनी घाण राजकारण सोडून विकासयात्रेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा: नाशिक : मानपानावरून छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, चाकूरचे नगराध्यक्ष कपिल माकणे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, उपनगराध्यक्षा कल्पना महाजन, गटनेते पप्पू भावे, वासुदेव चौधरी, विजय महाजन, माजी नगराध्यक्ष उषा वाघ, सुरेश चौधरी, चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, भगवान महाजन, बी. एन. पाटील, मोहन पाटील, ॲड. शरद माळी, राजेंद्र ठाकरे, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा: Nashik : द्राक्षनगरीत खाल्ला जातो दररोज 5 टन आंबा
प्रारंभी शासकीय आयटीआयपासून शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. नंतर प्रवेशद्वाराचे भूमिपूजन झाले. नंतर पाटावरील पुलाचे भूमिपूजन, गोशाळेजवळ पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन व महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्य कार्यक्रम जी.एस.नगरातील श्री लॉन्समध्ये झाला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम यांनी प्रास्ताविक केले. अभिजित पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तालुका संघटक ॲड. शरद माळी यांनी आभार मानले.
धरणगावकरांना मिळणार मुबलक पाणी
पालकमंत्री पाटील यांच्या प्रयत्नांनी धरणगाव पालिकेसाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत २७ कोटी ४४ लाख रुपयांचा पाणीपुरवठा प्रकल्प मंजूर झाला आहे. यात धावडा येथील पाण्याची उचल करण्यापासून ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती होणार आहे. यासोबत अनुक्रमे चार लाख २० हजार आणि तीन लाख ८० हजार लिटर्स साठवण क्षमतेचे दोन जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. जलकुंभांमधील पाणी प्रत्येक घरापर्यंत पोचविण्यासाठी तब्बल ७८ किलोमीटरची नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. रोज दरडोई तब्बल १३५ लिटर पाणी थेट त्यांच्या घरापर्यंत पोचणार आहे. दोन वर्षांत ही योजना पूर्णत्वाकडे येणार आहे.
Web Title: If You Want To Compete Do Development Leave Dirty Politics Gulabrao Patil Statement Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..