नाशिक : मानपानावरून छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohini Rahul Jakhere

नाशिक : मानपानावरून छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

घोटी (जि. नाशिक) : मोगरे (ता. इगतपुरी) येथील मोहिनी राहुल जाखेरे या नवविवाहितेने सासरी होणाऱ्या छळा, मानसिक त्रासाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या अठराच दिवसात नदीपात्रात स्वतःला झोकून देत आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ उडाली आहे. घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती व सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. (newly Married woman commits suicide because of harassment Nashik Suicidal death News)

हेही वाचा: Nashik : द्राक्षनगरीत खाल्ला जातो दररोज 5 टन आंबा

मोगरे येथील राहुल एकनाथ जाखेरे याच्याशी बांबळेवाडी येथील मोहिनी हिचा अठराच दिवासंपूर्वी विवाह झाला होता. लग्नांतर सासरी आलेल्या मोहिनीचा सासरचे लोक मानसिक छळ करीत होते असे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, त्यानुसार लग्नात अंगठी व मानपान दिला नाही म्हणून मोहिनीला सतत त्रास देण्यात येत होता. आपसांत नेहमी कुरबुरी सुरू होत्या. यावर दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी आपसांत समजूत घालून पुन्हा मोहिनी हिस नांदावयास पाठवले होते. मात्र काही दिवसातच मोहिनी ही हरवल्याची तक्रार सासरच्यांनी दिली. नऊ दिवसांनंतर मोहिनीचा मृत्यूदेह दारणा नदी पात्रात आढळून आला. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पती व सासरे यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: Nashik : महानगरपालिका क्षेत्रात विकासकामांसाठी 10 कोटी मंजुर

Web Title: Newly Married Woman Commits Suicide Because Of Physical Mental Harassment Nashik Suicidal Death News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top