शेतकऱ्यांच्या नावाने चांगभलं; नदीपात्रातील गाळ थेट वीटभट्ट्यांवर

जेसीबी व डंपर मालक दररोज शेतकऱ्यांच्या नावाखाली हजारो ब्रास (माती) गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करून वरणगाव येथील विटभट्ट्यांवर साठा करीत आहेत.
Transport
Transportesakal

वरणगाव (जि. जळगाव) : हतनूर धरण प्रकल्पांतर्गत मुक्ताईनगर शहरातील तापी व पूर्णा या नद्यांच्या काठावरील गाळाचा उपसा करून शेतकऱ्यांच्या नावाखाली शेकडो ब्रास (माती) गौण खनिजाचे कोणताही कर न भरता सर्रास उत्खनन सुरू आहे. जेसीबी मशिनच्या सहाय्याने उत्खनन करून डंपरमधून अवैध वाहतूक करून वरणगाव येथे साठा आणि वापर करणाऱ्या वीटभट्टी मालकांची पाठराखण करणाऱ्या साठेबाजांवर दंडात्मक कारवाईची मागणी वारंवार होत असताना त्यांना मुक्ताईनगर व भुसावळ तालुका महसुली प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.

मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा धरणांत पाणीसाठा मुबलक आहे. त्यामुळे गाळ काढणे शक्य होत नाही. हतनूर जलप्रकल्पांतर्गत मुक्ताईनगर येथील तापी व पूर्णा नद्यांमधील पाणी साठा कमी झाल्यामुळे वरणगाव व मुक्ताईनगरमधील जेसीबी व डंपर मालक दररोज शेतकऱ्यांच्या नावाखाली हजारो ब्रास (माती) गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करून वरणगाव येथील विटभट्ट्यांवर साठा करीत आहेत. त्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी मुक्ताईनगर व भुसावळ, तहसीलदार मुक्ताईनगर व भुसावळ यांनी संबंधितांवर दंडात्मक कारवाईची मागणी नागरिकांनी अनेकदा केलेली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील (माती) व गौण खनिजाचे उत्खनन केल्यानंतर आता या बेकायदेशीर वरणगावमधील वीटभट्टी मालकांनी गाळ उपशाच्या नावाखाली गौणखनिजाचा वापर शेतीमध्ये माती टाकत असल्याच्या नावाने उत्खनन, वाहतूक वापर आणि साठा मागील अनेक वर्षांपासून करून कोट्यवधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडविला असल्याची चर्चा आहे. तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित वीटभट्ट्यांवरील (मातीची) गौण खनिजाचे मोजमाप करण्याची मागणी केली होती. त्यावर दंडात्मक कारवाई करण्याची लेखी मागणी अनेकदा करूनही प्रशासनाकडून सतत या लेखी निवेदनाकडे डोळेझाक करून वीटभट्टी मालकांना मूक संमती आणि प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

Transport
निजामपूर : ऑनर किलिंग माणुसकीला काळिमा

लाखो रुपये कोणाच्या खिशात

अवैध उत्खनन करून गौण खनिजाचे स्वामित्वधन सरकारजमा न करता महसूल विभागाचे काही कर्मचारी मालामाल झाले आहेत. गौणखनिज माफियांनी हे प्रशासन पाळले की काय, असा संशय व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबीची गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे.

''वरिष्ठांच्या आदेशाने ३ ते ४ वीटभट्टयांचे मालकांना १० ते १२ लाख रुपये दंडाच्या नोटिसा देऊन कारवाई केल्या आहेत. पुढे ही प्रत्येक वीटभट्टीवर जाऊन मातीचे मोजमाप करून दंडात्मक कारवाया करणार आहे. मात्र राजकारण्यांचा हस्तक्षेप असल्याने अडचणी निर्माण होत आहे.'' - योगिता पाटील, मंडळ अधिकारी, वरणगाव विभाग

Transport
महिलांच्या छेडखानीसाठी शिट्ट्या वाजवल्याने धुमश्‍चक्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com