जळगाव : Omicronच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू

Omicron
Omicron esakal


जळगाव : कोरोनाच्या (Corona) संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ‘ओमिक्रॉन’ (Omicron) या नव्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे संसर्गाचा अधिक धोका निर्माण झाला आहे. ओमिक्रॉन मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले आहे. लग्नाला ५० तर अंत्यविधीसाठी पूर्वीप्रमाणे २० जणांची मर्यादा आखून देण्यात आली आहे.


लग्न समारंभासाठी, बंदिस्त जागेमध्ये किंवा मोकळ्या जागेत साजरे होणारे लग्न समारंभ हे केवळ ५० लोकांच्या मर्यादेत साजरा करता येतील. कार्यक्रम मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम हे केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत बंदिस्त जागेमध्ये किंवा मोकळ्या जागेत साजरा करता येतील, अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येईल. जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तीकरीत्या पोलिस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. शासनाच्या निर्देशानुसार कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था, घटक यांच्यावर पोलिस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संयुक्तरीत्या दंडात्मक कारवाई करावी व सदरची रक्कम शासनास जमा करावी.

Omicron
जळगाव महापालिकेचा अतिक्रमणधारकांना ‘अल्टिमेटम’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com