esakal | कोरोनाकाळात शिक्षक बनले 'टेक्नोसॅव्ही'! ऑनलाइन शिक्षणाचे नवे युग
sakal

बोलून बातमी शोधा

 teachers to work from home

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा ट्रेंड सुरू झाला. ऑनलाइन शिक्षणापेक्षा ऑफलाइन शिक्षण विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत करणारे असले तरी ते कोरोनापासून विद्यार्थ्यांचा बचाव करू शकणार आहे.

कोरोनाकाळात शिक्षक बनले 'टेक्नोसॅव्ही'! ऑनलाइन शिक्षणाचे नवे युग

sakal_logo
By
देविदास वाणी ः सकाळ वृत्तसेवा

जळगाव: कोरोना महामारीमुळे अनेकांचा रोजगार गेला. अनेकांना जीव गमवावा लागला. कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल होत आहेत. शिक्षण क्षेत्रातही मोठे बदल झाले. शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा ट्रेंड सुरू झाला. ऑनलाइन शिक्षणापेक्षा ऑफलाइन शिक्षण विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत करणारे असले तरी ते कोरोनापासून विद्यार्थ्यांचा बचाव करू शकणार आहे. भावी काळातही ४० टक्के शिक्षण ऑनलाइन व ६० टक्के ऑफलाइन देणारे धोरण शासनाचे आहे. ऑनलाइन शिक्षण देताना शिक्षकांना मोबाईलमधील अनेक बाबी, ऑनलाइन क्लास, व्हिडिओ, नोट्स अपलोड करणे आदी गोष्टी कराव्या लागल्या. यामुळे शिक्षक केवळ शिक्षक न राहाता नव्या युगाचे 'टेक्नोसॅव्ही शिक्षक' झाले आहेत.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात आता दररोज १ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांना ४० टक्के तंत्रस्नेही व्हावेच लागणार आहे. या धोरणात आता ४० टक्के शिक्षण ऑनलाइन, तर ६० टक्के शिक्षण ऑफलाइन राहणार आहे. यामुळे शिक्षकांना आता माहिती आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अपडेट राहावेच लागणार आहे. परदेशात ऑनलाइन शिक्षण केव्हाच सुरू झाले आहे. भारतात ते कोरोनानंतर सुरू झाले. ज्या शिक्षकांनी अनेक वर्षे ऑफलाइन शिकविण्यासाठी खर्ची केली, त्यांना ऑनलाइन शिक्षण शिकविणे जड जात आहे. असे असले तरी त्यांनी नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यावे. ती काळाची गरज आहे. शिक्षकांचे काम शिक्षण देणे. मग ते ऑनलाइन असो की ऑफलाइन. आपल्यातील जातिवंत शिक्षक जिवंत ठेवावाच लागेल.

- चंद्रकांत भंडारी, शालेय समन्वयक, केसीई सोसायटी व लेवा एज्युकेशन सोसायटी

हेही वाचा: गाय, म्हशीच्या दूध खरेदीदरात वाढ; जळगाव जिल्हा दूध संघाचा निर्णय

कोरोनोमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येण्यास निर्बंध होते. यामुळे शासनाच्या सूचनांप्रमाणे आम्ही ऑनलाइन विद्यार्थ्यांना कसे शिकवावे, उत्तरे कशी द्यावीत, पालकांशी ऑनलाइन संवाद कसा साधायचा, याचे गुगल क्लासरूमच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले. मोबाईलचा उपयोग ऑनलाइन शिक्षणासाठी, एकावेळी अनेक विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी करता आला. पूर्वी शिक्षक केवळ मोबाईलचा वापर संवाद साधण्यासाठी करीत हेाते. मात्र कोरोनाने शिक्षकांना मोबाईलच्या विविध उपयोगाचे टेक्निक शिकविले. विद्यार्थ्यांचा ऑनलाइन क्लास घेतानाचा आनंद वेगळाच आहे.

- गोपाळ चौधरी, उपशिक्षक, जि. प. शाळा, पिंप्रीसेकम

हेही वाचा: ब्रेकिंगः जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये ६ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. मोबाईलचा शिक्षणासाठी वापर एवढ्या चांगल्या पद्धतीने करता येईल, याची माहिती नव्हती. मोबाईलच्या तंत्रज्ञानाबाबत आम्ही अपग्रेड झालो आहोत. मात्र शिक्षण किमान पहिली ते बारावीपर्यंतचे ऑफलाइनच हवे. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी समोरासमोर दिलेले शिक्षण केव्हाही चांगले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम होतो व शिक्षकांना आपण ज्ञानदान केले अन् ते विद्यार्थ्यांना समजले याचे समाधान मिळते.

- प्रणिता झांबरे, पर्यवेक्षिका, ए. टी. झांबरे विद्यालय

loading image
go to top