esakal | गाय, म्हशीच्या दूध खरेदीदरात वाढ; जळगाव जिल्हा दूध संघाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

milk purchase

गाय, म्हशीच्या दूध खरेदीदरात वाढ; जळगाव जिल्हा दूध संघाचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाने (Jalgaon District Cooperative Milk Union) दूध खरेदीदरात वाढ (Increase in milk purchase rate) करून दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यानुसार गायीच्या दूध खरेदीदरात प्रतिलिटर एक रुपया, तर म्हैस दूध खरेदीदरात प्रतिलिटर तीन रुपये वाढ करण्यात आली.

हेही वाचा: कोकणच्या धर्तीवर जळगावच्या अतीवृष्टी बाधितांना मदत करा-खासदार पाटील

कोविड काळात झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी दूध संघाने एक मोठा निर्णय घेतला असून, दूध उत्पादकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाच्या खरेदीदरात वाढ केली आहे. खरेदीदरात वाढ झाली असली, तरी ग्राहकांसाठी दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: सकाळ ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात 24 तासांत कोरोनाचे 13 बळी 

खरेदीत तीन रुपयांनी वाढ

आता नवीन खरेदी दरवाढीनुसार गायीचे दूध (गुणवत्ता ३.५/८.५ टक्के) प्रतिलिटर एक रुपया, तर म्हशीचे दूध (६.०/९.० टक्के गुणवत्ता) खरेदीत प्रतिलिटर तीन रुपये दरवाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा: चाळीसगावच्या पूरग्रस्तांना पहिली मदत खाकीची..!


दोन लाख लिटर संकलन
सद्य:स्थितीत जळगाव जिल्हा दूध संघाचे प्रतिदिन दोन लाख लिटर दूध संकलन असून, या खरेदी दरवाढीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दरमहा सुमारे एक कोटी रुपये अतिरिक्त अदा करण्यात येणार आहेत. ही खरेदी दरवाढ १ सप्टेंबरपासूनच लागू करण्यात आली आहे.

loading image
go to top