
42 कोटीच्या रस्त्याच्या शुभारंभाला आता ‘अमृत’योजनेचा खोडा
जळगाव : शासनाकडून आलेल्या ४२ कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्याच्या शुभारंभाच्या कामालाच ‘अमृत’ योजनेने खोडा घातला आहे. प्रथम चार रस्त्यापैकी एकाही रस्त्याचे पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने या रस्त्यावर काम करण्यास पाणीपुरवठा विभागाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आता ही कामे केव्हा सुरू होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाकडून शहरातील रस्त्यासाठी आलेल्या ४२ कोटी रुपयांच्या निधीतून कामासाठी अनेक अडचणी आल्या आहेत. या सर्व अडचणींवर मात करून अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने मक्तेदाराला कामाचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषद ते अजिंठा चौफुली, काव्य रत्नावली चौक ते वाघनगर, शिवाजीनगर पूल ते विकास दूध फेडरेशन आणि गणेश कॉलनी ते कोर्ट चौक या चार मार्गापैकी एका मार्गावर काम सुरू करावे असे सांगण्यात आले. मक्तेदारानेही त्याबाबत तयारी दर्शविली महापालिकेकडून या चार रस्त्यापैकी ज्या रस्त्याला मंजुरी देण्यात येईल, त्या रस्त्यावर दोन दिवसात काम सुरू करण्याची त्यांनी तयारी दर्शविली.
हेही वाचा: अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; पोलिसात गुन्हा दाखल
‘अमृत’ने घातला खोडा
महापालिकेने चार रस्त्यापैकी एकाही रस्त्याच्या कामाला परवानगी दिली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या चारही रस्त्यावर ‘अमृत’योजनेचे काम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे या रस्त्यांना कामाची परवानगी देता येणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत चार रस्त्यापैकी एकाही रस्त्यावर मक्तेदाराला रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करता येणार नाही. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की आम्ही ‘अमृत’योजनेच्या मक्तेदाराला तातडीने काम करून रस्ते दुरुस्तीसाठी मोकळ करून देण्यास सांगितले आहे, परंतु अद्याप त्यांची कामे सुरूच आहेत.
टॉवर ते चित्रा चौक एक मार्ग शक्य
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की शनिवारी (ता. २१) सायंकाळपर्यंत चार रस्त्यापैकी टॉवर ते अजिंठा चौक रस्त्यावरील काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर या रस्त्यावरील काम पूर्ण झाले तर या रस्त्याच्या एका मार्गासाठी परवानगी देता येईल. मात्र सद्य:स्थितीत चित्रा चौकात सुरू असलेले पाइप टाकण्याच्या कामाचा आढावा घेऊनच ही परवानगी देण्यात येईल. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या एका मार्गाचे कामाची सुरवात होऊ शकेल.
हेही वाचा: प्लॅस्टिक पिशव्या बंद करा; महापालिका आयुक्तांचा विक्रेत्यांना इशारा
''शहरातील बहुतेक भागात ‘अमृत’ योजनेचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम झाल्यानंतर यासाठी पुन्हा रस्ता खोदावा लागले, पुन्हा ते होवू नये यासाठी ज्या भागात रस्त्याचे काम होणार आहे, त्या भागात अमृतचे काम करून घेण्यात येत आहे. मात्र सद्या चार रस्त्यापैकी एकाही रस्त्याच्या कामाला परवानगी देता येणार नाही.'' - गोपाल लुले, अभियंता, पाणीपुरवठा विभाग.
Web Title: Inauguration Of 42 Crore Road Works In Jalgaon Stalled Due To Amrut Yojana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..