
प्लॅस्टिक पिशव्या बंद करा; महापालिका आयुक्तांचा विक्रेत्यांना इशारा
जळगाव : एकेरी वापराच्या प्लॅस्टिक पिशव्या (कॅरी बॅग) कोणत्याही परिस्थिती वापरू नका, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी शहरातील विक्रेत्यांना दिला आहे.
प्लॅस्टिक पिशव्या वापराविरुद्ध महापालिकेने आता कडक धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात आयुक्त विद्या गायकवाड यांनी शहरातील विक्रेत्यांवर तसेच उत्पादकांवर अचानक छापे टाकून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या होत्या. आता ही मोहीम आणखी व्यापक स्थितीत राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांनी शहरातील विक्रेत्यांना अगोदर त्याबाबत माहिती देण्याचा निर्णय घेउन महापालिकेत बैठक आयोजित केली होती.
हेही वाचा: विकासकामांना स्थगिती आणण्याचा करंटेपणा करू नये : एकनाथ खडसे
महापालिकेच्या सभागृहात ही बैठक झाली. शहरातील भाजीपाला, फळ विक्रेते, व इतर व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी विक्रेत्यांच्या समस्याही ऐकून घेतल्या त्यानंतर त्यांनी सांगितले, की एकेरी वापराच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा कोणत्याही परिस्थितीत विक्रेत्यांनी वापर करून नये, जर विक्रेत्यांकडे त्या आढळल्या तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
नागरिकांवरही कारवाई
नागरिकांनी बाजारात येताना कापडी पिशव्या घेऊन यावे, असे आवाहन करून त्यांनी म्हटले आहे, की जर नागरिकांकडे कॅरिबॅग आढळल्या तर त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या बैठकीला आरोग्याधिकारी अभिजित बाविस्कर, अतिक्रमण विभागप्रमुख संजय ठाकूर आदी उपस्थित होते.
हेही वाचा: Youtube पाहून तो घरातच छापायचा बनावट नोटा; हिंगणेच्या तरुणाचा प्रताप
Web Title: Municipal Commissioner Warns Vendors Not To Use Plastic Bags
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..