जळगाव : रखडलेला उड्डाणपूल, चालकाची डुलकी अन्‌ मृत्यूचा वेग

Road Accident
Road Accidentesakal

जळगाव : जळगाव-नागपूर महामार्गावर भल्या पहाटे साडेसहाच्या सुमारास भादली रेल्वे उड्डाणपुलावर (flyover) जळगावकडे येणाऱ्या ट्रकने एका मागून एक दोन महिंद्रा पिकअप व्हॅनला धडक दिली. अपघाताची (Accident) भीषणता इतकी होती, की छोट्या वाहनांच्या चिंध्या झाल्या. फोर-वे होत असलेला महामार्ग अपघातग्रस्त पुलावरच टू-वे झाला. ट्रकचालकाला पहाटेची डुलकी अन्‌ उभय वाहनांच्या गतीने मृत्यूचे (death) रौद्ररूप धारण केले. (incomplete work of flyover cause accidental deaths cases raised Jalgaon news)

बुधवारी फैजपूर येथे आठवडेबाजार भरतो. बाजारातून बकऱ्यांसह इतर उपयुक्त पशुंच्या खरेदी-विक्रीसाठी व्यापारी, व्यावसायिक आणि खाटीक असे बोलेरो पीकअप वाहनांनी (एमएच ४३, एडी १०५१) व (एमएच ४३, बीबी ५०) भुसावळकडे जात होते. त्याचवेळी समोरून सुसाट वेगात येणारी ट्रकने (एमएच ०९, एचजी ९५२१) एका मागून एक दोन्ही वाहनांना धडक दिली. अपघातात ट्रक उड्डाणपुलावरील पिलरला धडकला, तर दोन्ही पिकअप वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. पिकअपच्या बॉडीचे तुकडे तुकडे मानवी देहासह पुलावरून खाली फेकल्याचे विदारक चित्र बघायला मिळाले.

राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे अनेक निरपराध नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले असून, या अपघाताच्या प्रमुख कारणापैकी एक रखडलेले काम हेही आहे. भुसावळकडून सुसाट येणारा फोर-वे हायवे अचानक भादली उड्डाणपुलावरच टू-वे होऊन जातो. त्यात नव्या चालकाला फारसे कळण्याआधीच दोन्ही बाजूने या पुलावर वाहनांच्या रांगा सुरू असतात. परिणामी, रोजच या पुलावर अपघाती मृत्यू होऊ लागले आहेत.

मृत्यूच्या वेगावर पहाटेची डुलकी

अपघाताला कारणीभूत ट्रकचालक वसंत रामहरी देऊळकर (रा. अकोला, वय ५५) नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जात होता. पहाटे ट्रक थांबवून आराम न करताच ट्रक दामटत असताना, सुसाट ट्रकने ओव्हरटेक करताना दोन पिकअप व्हॅनला चिरडून चौघांचा जीव घेतला. चालक देऊळकरला पहाटेची डुलकी लागण्याची शक्यताही वर्तविली जात असून, त्यांचा जबाब घेतल्यावरच नेमकी माहिती समोर येईल.

ट्रकचा टायर फुटला, मात्र नंतर...

चार लोकांचा जीव घेणाऱ्या ट्रकवरील जखमी चालकाला पोलिसांनी तोंडी विचारपूस केल्यावर त्याने ट्रकचे चाक फुटल्याचा बनाव केला. मात्र, ट्रकचे चाक फुटल्याने अपघात घडला नसून अपघात घडल्यानंतरही वेगवान ट्रक पुलाच्या कठड्याला टायर घासत पिलरवर चढल्याने टायरचा ब्लास्ट झाला. तत्पूर्वी दोन्ही पिकअप व्हॅनच्या या ट्रकने चिंध्या-चिंध्याच केल्या हेात्या, ही बाब समोर आली.

Road Accident
शहरातून चोरी झालेल्या कारचा मालेगावच्या जबरी चोरीत वापर

खाटीक बिरादरी शोकमग्न!

येत्या आठवड्यात बकरी ईद साजरी होणार आहे. रावेर व फैजपूर या बाजारांत कुर्बानीसाठी बोकड चांगल्या व रास्त भावात मिळतात. बकरी ईदपूर्वीच्या बाजारातून बोकड खरेदीसाठी व्यावसायिक, पशूपालक आणि खाटीक असे एकत्रित फैजपूर बाजारात निघाले असताना, पहाटे अपघात घडला. ईदच्या पूर्वीच्या बजाराला निघालेल्या चौघांचा अपघाती मृत्यू ओढवल्याने कुटुंबीय नातेवाइकांसह संपूर्ण बिरादरी शोकमग्न झाली आहे. मृत जुनेद सलीम खाटीक (वय १८, रा. आझाद चौक, भडगाव) यांच्या पश्चात आईवडील भाऊ असा परिवार आहे. अकील गुलाब खाटीक (वय ४२, रा. फैजपूर, ह.मु. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी व भाऊ आहे, नईम अब्दुल रहीम खाटीक (५५, रा. बिलाल चौक, जळगाव) यांच्या पश्चात ५ मुले, पत्नी, भावंडे आहेत, तर फारूख मजीद खाटीक (४०, रा. आझाद चौक, भडगाव) यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा आई वडील असा परिवार आहे.

Road Accident
'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल...' आता गाणंबी व्हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com