Latest Marathi News | भारतीय कला संस्कृतीचे दर्शन साता समुद्रापार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Dance Culture

Indian Culture : भारतीय कला संस्कृतीचे दर्शन साता समुद्रापार

निंभोरा बुद्रकु : ‘आजादी का अमृत महोत्सव’चे औचित्य साधून केंद्र शासनाकडून जगातील विविध देशात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी नृत्य पारंगत असलेल्या कलाकारांची निवड केली आहे.

त्यात डोंबिवली भरतनाट्यम् नृत्य शैलीत पारंगत असलेल्या पवित्रा आर्ट इन्स्टिट्यूटच्या नृत्य शिक्षकासह ७ विद्यार्थिनींची निवड झाली असून, मूळची निंभोरा (ता. रावेर) येथील डोंबिवली स्थित जिज्ञासा गिरडे हिला देखील आपला नृत्याविष्कार ऑस्ट्रेलियात सादर सादर करणार आहे.(Indian Art culture Dance Bharatanatyam popular in foreign Jalgaon News)

हेही वाचा: Crime News : वाढदिवसाला जाणाऱ्या तरुणावर चॉपरने हल्ला

जिज्ञासा गिरडे ही निंभोरा बुद्रुक (ता. रावेर) येथील मूळ रहिवासी व डोंबिवली येथे कार्यरत असलेले शिक्षक प्रकाश गिरडे व माधवी गिरडे यांची मुलगी आहे. भारतातर्फे जिज्ञासा गिरडे हिला ऑस्ट्रेलियात कला सादर करण्याची संधी मिळाल्याने तिचे ग्रामस्थांन कौतुक केले आहे.

हेही वाचा: Jalgaon : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेस मारहाण

टॅग्स :IndiaJalgaondance