
Jalgaon News : अखेर पारोळ्यातील वाढीव पाणीपुरवठा योजनेस हिरवा कंदील
पारोळा : गेल्या अनेक दिवसांपासून मंजूर होऊन भूमिपूजनासाठी रखडलेल्या ५३ कोटी ६९ लाखांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामास अखेर गुरुवारी (ता. १२) प्रारंभ झाला.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरात जुनी व जीर्ण जलवाहिनी असल्यामुळे पिण्याचा प्रश्न उद्भवत होता. परिणामी, शहरवासीयांना बारा बारा दिवस पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत होती. ही बाब लक्षात घेता आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत योजनेस मंजुरी आणली. (Initiation of Parola increase water supply scheme Jalgaon News)
सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
हेही वाचा: Crime News : धक्कादायक घटना! महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्या मित्रासमोरच सामूहिक बलात्कार
मुख्यमंत्री शिंदे यांनी योजनेस तातडीने मंजुरी करून दिली.
दरम्यान, ही योजना रखडली होती. मात्र शासनाचा आलेला निधी उपलब्ध साधनसामुग्री आणि या योजनेचे काम करणारी यंत्रणा तयार होती. या पार्श्वभूमीवर शहराच्या उत्तरेकडील यू बालाजीनगर चोरवड रोड या विभागापासून नवीन ११० एमएमची जलवाहिनी टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.
या वेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी ज्योती भगत, अभियंता अभिषेक काकडे, न्यू बालाजीनगर येथील रहिवासी यांच्या उपस्थितीत या योजनेस प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, वाढीव पाणीपुरवठा योजना ही शहरासाठी उपयुक्त अशी योजना असून कामात सातत्य असावे, अशी अपेक्षा शहरवासीयांनी केली आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा योजनेसाठी शहरवासीयांनी वेळोवेळी सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ही नगरोत्थान वाढीव पाणीपुरवठा योजना असून शहराची आणि वितरणाची परिस्थिती पाहता ही योजना शहरवासीयांसाठी उपयुक्त आहे.
हेही वाचा: Nashik News : अश्विनीनगर उद्यानाला अवकळा; उद्यान दुरवस्थेकडे प्रशासनाचा काणाडोळा!