जळगाव मनपा आयुक्तांकडून कर्मचाऱ्यांची ‘हजेरी’; प्रमुखांना कारणे दाखवा

आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर श्रीमती गायकवाड यांनी कामांचा धडाका लावला आहे.
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

जळगाव : महापालिकेच्या आयुक्तपदी कार्यभार स्वीकारल्यानंतर विद्या गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांची ‘हजेरी’ घेतली आहे. अचानक तपासणीत कर्मचाऱ्यांच्या रजांची नोंद नसल्याने त्यांनी सर्वच विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर प्रमुख अधिकाऱ्यांना अन्य विभागांचा अतिरिक्त कार्यभारही सोपविला आहे. (Inquiry of employees by Jalgaon Municipal Commissioner)

मावळते आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी यांच्या निवृत्तीनंतर लगेचच सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या विद्या गायकवाड यांची जळगाव महापालिकेच्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. पालिकेच्या पहिल्याच महिला आयुक्त म्हणून त्यांनी हा पदभार नुकताच स्वीकारला.

Jalgaon Municipal Corporation
राज्यात ‘रोहयो‘चे 415 कोटी 97 लाख रुपयांचा निधी थकीत

कामांचा लावला धडाका

आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर श्रीमती गायकवाड यांनी कामांचा धडाका लावला आहे. पहिल्याच दिवशी मनपा इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ कर्मचाऱ्यांची ‘हजेरी’ त्यांनी घेतली. कार्यालयीन वेळ पाळली जाते की नाही, याबाबत त्यांनी तपासणी केली.

रजांच्या नोंदी नाही

दुसऱ्याच दिवशी मनपा इमारतीत विविध विभागांना भेट देऊन नियमित हजेरी, रजांच्या नोंदी तपासल्या. त्यात त्यांना अनियमितता आढळून आली. हजेरी पत्रकात बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या नावासमोर किरकोळ रजा लिहिल्याचे दिसून आले, पण त्यांचा रजेचा नोंदीला आढळून आला नाही. अनेक कर्मचारी अनधिकृतपणे गैरहजर असल्याचेही आढळून आले.

प्रमुखांना कारणे दाखवा

या गंभीर बाबी आढळून आल्यानंतर गायकवाड यांनी विभाग प्रमुखांना त्यासंदर्भात जबाबदार धरले आहे. ज्या- ज्या विभागात असे गंभीर प्रकार आढळून आले त्या प्रत्येक विभाग प्रमुखाला त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपल्या अखत्यारित कर्मचाऱ्यांच्या हजेरीच्या नोंदी तातडीने सादर कराव्यात, तसेच रजांच्या संदर्भात तपशील व सर्व नोंदी नियमित ठेवाव्यात, असेही त्यांनी बजावले आहे.

उपायुक्तांकडे अतिरिक्त कार्य

कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेताना त्यांनी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर अन्य विभागांचा अतिरिक्त कार्यभारही सोपविला आहे. त्यात उपायुक्त श्‍याम गोसावी यांच्याकडे आरोग्य विभागासह प्रभारी अतिरिक्त आयुक्त, अतिक्रमण व महिला- बालकल्याणचा अतिरिक्त भार सोपविला आहे. उपायुक्त प्रशांत पाटील यांच्याकडे महसूलसह मुख्य लेखा परीक्षक म्हणून अतिरिक्त कार्यभार, मुख्य लेखा अधिकारी असलेल्या चंद्रकांत वानखेडे यांच्याकडे सामान्य प्रशासनाचे उपायुक्त हा अतिरिक्त पदभार तर सहाय्यक आयुक्त अभिजित बाविस्कर यांच्याकडे विधी व वाहन विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

Jalgaon Municipal Corporation
''सरकारी तिजोरीवर मविआ सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकतयं'' - सदाभाऊ खोत

अन्य अधिकाऱ्यांनाही जबाबदारी

नगरसचिव सुनील गोराणे यांच्याकडे अभिलेख, दवाखाने व भांडार विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त, कार्यालय अधीक्षक चंद्रकांत वांद्रे यांच्याकडे घरकुल अधीक्षकासह आता प्रभाग समिती क्र. ४ चे अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार, प्रभाग समिती क्र. १चे अधीक्षक मणिराम डाबोरे यांच्याकडे ग्रंथपालपदाचा अतिरिक्त पदभार, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संजय पाटील यांच्याकडे प्रभाग क्र. १२ ते १५च्या पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त पदभार, आस्थापना विभागातील लिपिक अविनाश बाविस्कर यांच्याकडे कार्यालय अधीक्षकासह कोर्ट व रोजंदारी कार्यासनासह अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com