Jalgaon News : जळगावकरांना मिळणार बाजरीची खिचडी, पोहे अन्‌ पापडही; कृषी विभागाचा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

International Year of Nutritious

Jalgaon News : जळगावकरांना मिळणार बाजरीची खिचडी, पोहे अन्‌ पापडही; कृषी विभागाचा उपक्रम

जळगाव : केंद्र शासनाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्या अंतर्गत ‘मकरसंक्रांती-भोगी’ हा सणाचा दिवस ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ अर्थात, १५ जानेवारीला हा दिवस साजरा होणार आहे, तर कृषी विभागातर्फे १९ जानेवारीस बहिणाबाई उत्सवात बाजरीची खिचडी, पोहे, उपमा, पापड यांसह विविध पदार्थ तयार करून देण्यात येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष असल्याने बाजरी, नाचणी, ज्वारी, दादर, अशा पदार्थांपासून काय काय पदार्थ बनविले जातात, ते आरोग्यास कसे पोषक आहेत, याची माहिती या वेळी देण्यात येणार आहे. (International Year of Nutritious Cereals Agriculture department activity Jalgaon News)

हेही वाचा: Nashik Accident News : महामार्गावर शहर गुन्हे शाखेच्या वाहनाला अपघात

लहान मुलांना डोळ्यांचे विकार

सध्याचा जमाना इन्सटंटचा आहे. रेडिमेड खाद्यपदार्थ, सीलबंद पदार्थ, जंकफूड खाण्यावर लहानापासून सर्वांचा भर आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून लहान वयातही बालकांना मधुमेह, कमी दिसणे, असे आजार जडले आहेत, तर मोठ्यांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास सुरू झाला आहे. चाळिशीनंतर सर्वांनाच मधुमेह, रक्तदाब कॉमन झाला आहे.

लहान मुले सध्याचे जंक फूड, तळलेले पदार्थ, गव्हाची पोळी, भात न चावता तो सरळ गिळतात. यामुळे अपचन होऊन आरोग्याच्या तक्रारी उद्‌भवतात. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच रोजच्या आहारात तृणधान्याचा वापर केला, तर आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टळतील.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

हेही वाचा: Nashik Crime News : बाईक रायडर्स ग्रुपला गंगापूर पोलिसांकडून तंबी

१५ जानेवारीस प्रत्येक कृषी सहाय्यक आपल्याकडील गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्र, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनविण्यात येणाऱ्या विविध उपपदार्थांची माहिती देण्यासाठी प्रगतिशील शेतकरी, आहारतज्ज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञांना निमंत्रित करून कार्यक्रम होणार आहेत.

सुदृढ पिढीसाठी तृणधान्य गरजेचे

लहानपणापासूनच मुलांना तृणधान्याचे पदार्थ, भाकरी खाण्याची सवय लावली, तर त्यांचे पुढील आयुष्य निरोगी होऊ शकते. जुने नागरिक तृणधान्याचा वापर रोजच्या जीवनात करीत होते, म्हणून ते ९० ते १०५ वर्षांपर्यंत जगत होते. आता तसे दिसत नाही. २५ व्या वर्षीच हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, लहान मुलांना डोळ्यांचे विकार जडत आहेत. यामुळे सर्वांनीच रोज तृणधान्याचा वापर करणे गरजेचे असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा: Pune News : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली ॲड. डॉ. नीला गोखले यांची न्यायाधीश पदासाठी शिफारस