Nashik Crime News : बाईक रायडर्स ग्रुपला गंगापूर पोलिसांकडून तंबी

Rash Driver Against police action
Rash Driver Against police actionesakal

नाशिक : शहरात काही दिवसांपासून पोलिसांनी रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांसह सायलेंसरमध्ये फेरबदल करून कर्णकर्कश आवाज करीत धावणाऱ्या बाईक रायडर्सविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गतच, गंगापूर पोलिसांनी युनायटेड बाईक रायडर्स या नावाने असलेल्या ग्रुपच्या सदस्यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेत ध्वनिप्रदूषण तसेच रॅश ड्रायव्हिंग न करण्याची तंबी देतानाच, याबाबत ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्याचेही आवाहन केले.

दरम्यान, गंगापूर पोलिसांनी गेल्या काही आठवड्यात सायलेंसरमध्ये फेरबदल करून कर्णकर्कश आवाज करीत धावणाऱ्या २८ दुचाकी जप्त करीत गुन्हे दाखल केले आहेत.
परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या आदेशानुसार, गंगापूर पोलिसांनी त्र्यंबक रोड, कॉलेज रोड आणि गंगापूर रोड या परिसरात रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या बाईक रायडर्स व कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीचालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. (Deputy Commissioner Kiran Kumar Chavan Action Against Rash driver Nashik News)

Rash Driver Against police action
Nashik News : उद्यानातील खेळण्या चोरट्यांकडून लंपास; मृत्युंजय महादेव मंदिर उद्यानाची दुरवस्था!

याच मोहिमेंतंर्गत शहरात हायप्रोफाईल वर्गातील ‘युनायटेड बाईक रायडर्स’ या ग्रुपच्या सदस्यांना गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांनी ठाण्यात बोलावून घेतले होते. शेख यांनी संबंधित सदस्यांना त्यांच्याकडे असलेल्या बाईकची माहिती घेतली.

या ग्रुपमधील सदस्यांकडे अत्यंत महागड्या किमतीची बाईक असून, त्यांचा वेग अधिक आणि आवाजही मोठा येतो. परंतु त्यामुळे रहिवासी परिसरात वा शाळा-महाविद्यालय, हॉस्पिटलच्या परिसरामध्ये यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे, या बाईक चालविताना कोणाला त्रास होणार नाही. ध्वनिप्रदूषण होणार नाही याची दक्षता घेऊन त्या चालवाव्यात.

तसेच, सायलेंसरमध्ये फेरबदल केल्यास गुन्हे दाखल करून वाहन जप्त करण्यात येईल अशीही तंबी दिली. त्याचप्रमाणे, वाहनांमुळे ध्वनिप्रदूषण होऊ नये असा सामाजिक संदेश ग्रुपच्या माध्यमातून शहरातील अन्य वाहन चालकांमध्ये करण्याचेही आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेख यांनी बाईक रायडर्सच्या सदस्यांना केले. यावेळी सहायक निरीक्षक महेश येसेकर उपस्थित होते.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

Rash Driver Against police action
Nashik Crime News : नववर्षातही घरफोड्यांचे सत्र कायम; 10 दिवसांत 14 घटनांनी शहरवासीय हादरले

पंजाब ढोलकीच्या दोघांना दंड
दुचाकीच्या सायलेंसरमध्ये फेरबदल करून कर्णकर्कश आवाज करीत वेगात धावणाऱ्या दोघा दुचाकी चालकांविरुद्ध गंगापूर पोलिसांनी प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे १० हजार रुपयांचा दंड केला. सदर बाईक रायडर्स हे ‘पंजाब ढोलकी बाईक रायडर्स या ग्रुपचे सदस्य होते. या वेळी पोलिसांनी या ग्रुपच्या सदस्यांनाही वाहनांचे सायलेंसरमध्ये फेरबदल केला असल्यास गुन्हा दाखल करून कारवाई केली जाण्याचे बजावले आहे.

"सर्वसामान्य नागरिकांना बाईक रायडर्सच्या वाहनांमुळे त्रास होतो. त्यामुळे बाईक रायडर्स ग्रुपच्या सदस्यांना याबाबत सूचना देत ध्वनी प्रदूषण न करण्याच्या सूचना केल्या आहेत."
- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक.

Rash Driver Against police action
Nashik Municipal News : जाहिरात शुल्क वाढीचा निर्णय ठराविक ठेकेदारांसाठी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com