Jalgaon News : मनपा संकुलातील गाळे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा

jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporationesakal

Jalgaon News : महापालिकेच्या गाळे नूतनीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. रेडीरेक्नरदरावर केवळ तीन टक्के गाळ्यासाठी आकारणी करण्यात येणार आहे. त्याबाबत लवकरच अध्यादेश निघणार असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली. (issue of renewal of Municipal Corporation has been resolved jalgaon News)

महापालिकेच्या २८ व्यापारी संकुलातील २,३६८ गाळेधारकांचा करार, तसेच गाळेभाड्याचा प्रश्‍न प्रलंबीत होता. याबाबत गाळेधारकांनी थेट महापालिकेविरोधात शासनाकडे अर्ज केला होता. तरीही प्रश्‍न सुटला नव्हता. याबाबत आमदार राजूमामा भोळे यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.

यासंदर्भात २५ मार्च २०२२ च्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गाळ्यांसंदर्भात लक्षवेधी मांडली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही. मात्र, राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्‍नाची खऱ्या अर्थाने दखल घेतली.

त्यासाठी वेळोवेळी बैठका घेतल्या. आमदार सुरेश भोळे यांचा पाठपुरावा सुरूच होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, जळगाव शहरातील २,३६८ गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली. गाळे नूतनीकरणासाठीं रेडीरेक्नर दरावर पूर्वी गाळे व फ्लॅटसाठी सरसकट आठ टक्के दराने आकारणी करण्यात येणार होती.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

jalgaon municipal corporation
Market Committee Election : महाआघाडी, भाजपच्या उमेदवारीकडे लक्ष; ग्रामीण भागात प्रचार शिगेला

ती आता कमी केली असून, गाळे नूतनीकरणासाठी रेडीरेक्नर दरावर केवळ तीन टक्के, तर फ्लॅट नूतनीकरणासाठी रेडीरेक्नर दरावर केवळ दोन टक्के आकारणी होणार आहे. याशिवाय गाळेधारकांना सवलती दिल्या आहेत. यासंदर्भात आगामी दोन दिवसांमध्ये अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अनमोल सहकार्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.

"राज्य सरकारने महापालिका व्यापारी संकुलातील गाळेधारकांच्या हिताच्या दृष्टीने सकारत्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे गाळेधारकांचा गाळे नूतनीकरणाचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे." -सुरेश भोळे, आमदार, जळगाव

jalgaon municipal corporation
Eknath Khadse : अजितदादांनीच 'हा' दावा फेटाळून लावलाय; काय म्हणाले एकनाथ खडसे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com