Jalgaon Unseasonal Rain : पन्नासपेक्षा अधिक घरांचे बेळीत उडाले छत

Unseasonal Rain
Unseasonal Rain esakal

Jalgaon News : तालुक्यातील बेळी येथे गुरुवारी (ता. २७) दुपारी आलेल्या तुफानी वादळामुळे ५० पेक्षा जास्त घरांचे छत उडून गेले. (Jalgaon Unseasonal Rain roofs of more than 50 houses were blown off due to typhoon jalgaon news)

बेळी गावात दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. वादळामुळे झाडे उन्मळून पडली. यामुळे गावात शिरण्यासही अडचण येत आहे. वादळामुळे शेतांमधील पीक अक्षरश: आडवे झाले असून, शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे.

वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली व रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Unseasonal Rain
Rain Damage : नशिराबादला वृक्ष पडून घरांचे नुकसान; अर्धा तास चालले थैमान

वादळामुळे बेळी येथील ५० पेक्षा जास्त घरांची पत्रे उडली असून, त्या लोकांचा संसार अक्षरश: उघड्यावर आला आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Unseasonal Rain
Government Ordinance : गाळे भाडेपट्ट्यासाठी 3 टक्के आकारणी; शासनाचा अध्यादेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com