Jalgaon Power Supply Crises : जिल्ह्यातील 1 लाख शेतकरी वीजबिल माफीपासून वंचित

Power Supply Crises : चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, जळगाव, धरणगाव या सात तालुक्यांत साधारणपणे ७५ हजार शेतकऱ्यांकडे पंप ७.५ एचपीवरील आहेत.
Power Supply Off
Power Supply Offesakal
Updated on

Jalgaon Power Supply Crises : तालुक्यात ७.५ एचपीवरील पंप असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ९ हजार असून, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, जळगाव, धरणगाव या सात तालुक्यांत साधारणपणे ७५ हजार शेतकऱ्यांकडे पंप ७.५ एचपीवरील आहेत. तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हीच संख्या एक लाखावर आहे. या १ लाख शेतकऱ्यांना वीजबिल माफी मिळण्यासाठी जिल्ह्यातील मंत्र्यांना शेतकरी कृती समिती साकडे घालणार आहे. (1 lakh farmers in district deprived of power bill waiver)

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की ७.५ एचपी आतील पंपांची सरकारने वीजबिल माफ केले. मात्र, ७.५ एचपीवरील पंपास वीजबिल माफ नाही. या निर्णयाने जिल्ह्यात सारेच शेतकरी संकटात सापडले आहेत. अधिकचे हॉर्स पॉवर फक्त पाणीपातळी खोल असल्याने आहेत. यात शेतकऱ्यांचा काय दोष? त्याने शेतकऱ्यांना काय फायदा?, पण सरकारने त्या शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. (latest marathi news)

Power Supply Off
Jalgaon Power Cut : वीजखांब कोसळल्याने निम्मी रावेर अंधारात; पालिकेच्या जलवाहिनीला सतत गळतीने कृत्रिम पाणीटंचाई

जिल्ह्यातील मंत्र्यांना याबाबत माहिती देऊन शेतकरी कृती समिती साकडे घालणार आहे. शनिवारी (ता. ६) पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, मंत्री अनिल पाटील आदींची भेट घेणार आहेत. जिल्ह्यातील मंत्र्यांना वरील बाब लक्षात आणून देणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याची दुरुस्ती अधिवेशन सुरू असेपर्यंत करता येईल. त्यामुळे शिष्टमंडळात व ज्यांना शक्य आहे, त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Power Supply Off
Power Supply : पावसाळ्यात वारंवार वीज पुरवठा का होतो खंडित?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.