Jalgaon Power Cut : वीजखांब कोसळल्याने निम्मी रावेर अंधारात; पालिकेच्या जलवाहिनीला सतत गळतीने कृत्रिम पाणीटंचाई

Jalgaon News : रात्री अचानक विजेचा खांब कोसळल्याने मध्यरात्रीपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता तर सकाळपासून नवीन विजेचे खांब बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
Electricity board staff during Raver electricity connection work, Water accumulated in a pit due to a leak in the municipal water line on Juna Savda road.
Electricity board staff during Raver electricity connection work, Water accumulated in a pit due to a leak in the municipal water line on Juna Savda road.esakal

Jalgaon News : येथील जुना सावदा रस्त्यावर पुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी गुरुवारी (ता. १८) रात्री अचानक विजेचा खांब कोसळल्याने मध्यरात्रीपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता तर सकाळपासून नवीन विजेचे खांब बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. उष्णतेचे तापमान ४२ अंशावर असल्यामुळे उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. (Jalgaon Half of Raver in darkness due to power pole collapse)

दरम्यान, पालिकेच्या जलवाहिनीला सतत गळती लागत असल्यामुळे शहरातील काही भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. एप्रिलपासून जुना सावडा रोडवरील पुलाचे काम सुरू झाले आहे. या पुलाचे काम सुरू झाल्यापासून अनेक विघ्न येत आहेत. पालिकेच्या जलवाहिनीला वारंवार गळती होत आहे. यामुळे पंचमुखी हनुमाननगर, स्टेशन रोडवरील पाणीपुरवठा खंडित होत आहे.

यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत तर जलवाहिनीतून लिकेज झालेले पाणी पुलासाठी पाया खोदलेल्या खड्डयात येत आहे. यामुळे ठेकेदारही त्रस्त झाले आहेत. यामुळे पुलाच्या कामाला गती मिळू शकत नाही. (latest marathi news)

Electricity board staff during Raver electricity connection work, Water accumulated in a pit due to a leak in the municipal water line on Juna Savda road.
Jalgaon ZP News : अंगणवाड्यांचा 6 कोटी 89 लाखांचा निधी परत; जिल्हा परिषदेचा असाही गोंधळ

पुलासाठी खोदलेल्या पाया जवळच विजेचा खांब होता. काल रात्री हवेमुळे खांब कोसळून विजेच्या तारा तुटल्या. यामुळे रावेर शहर मध्यरात्रीपर्यंत अंधारात होते तर सकाळपासून विजेचे खोब उभारण्याचे व वीज तारा जोडणीचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.

यामुळे निम्मी रावेर शहरात वीजपुरवठा खंडित होता. आज ४२ अंशापेक्षा अधिक तापमान असल्यामुळे उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

Electricity board staff during Raver electricity connection work, Water accumulated in a pit due to a leak in the municipal water line on Juna Savda road.
Jalgaon Lok Sabha Constituency : भाजप या वेळी विजयात ‘पास’ होणार की ‘फेल’

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com