SAKAL Impact : चाळीसगावला 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर!

Jalgaon : तालुक्याचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेता, येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत होती.
SAKAL Impact
SAKAL Impact esakal

Jalgaon News : तालुक्याचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेता, येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. या संदर्भात दै. ‘सकाळ’ने वृत्तदेखील प्रसिद्ध केले होते. अखेर शासनाकडून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले असून, चाळीसगाववासीयांना महायुती सरकारने ‘आरटीओ’ कार्यालयापाठोपाठ उपजिल्हा रुग्णालय दिल्याने तालुकावासीयांना आरोग्यदायी भेट दिली आहे. (Jalgaon 100 bed sub district hospital approved for Chalisgaon)

जळगाव जिल्ह्यातील मोठा तालुका असलेल्या चाळीसगावला उपजिल्हा रुग्णालय नसल्यामुळे नागरिकांना उपचारासाठी जळगाव, धुळे किंवा छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रूग्णालयाचा आधार घ्यावा लागत होता. सद्यःस्थितीत असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात येऊन त्याच ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती.

मात्र, याबाबतचा संयुक्तिक असा प्रस्तावच राज्य शासनाकडे दिला गेलेला नव्हते. परिणामी, अनेक वर्षे या मागणीला मूर्त स्वरूप आले नव्हते. आमदार मंगेश चव्हाण यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शासन दरबारी या मागणीसंदर्भात युद्धपातळीवर पाठपुरावा केला. राज्यात तब्बल १३ वर्षांनंतर मंजूर झालेल्या पहिल्या ‘आरटीओ’ कार्यालयानंतर अवघ्या पाचच दिवसात उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले, की चाळीसगाव तालुका लोकसंख्या व भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका असूनही येथे आवश्यक त्या प्रशासकीय व आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. छोट्या छोट्या कारणांसाठी शंभर किलोमीटरवरील जळगावला जाण्याशिवाय पर्याय राहत नव्हता.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यातील अनेक प्रमुख प्रशासकीय कार्यालये, इमारती चाळीसगाव येथे मंजूर केल्या. त्यात आता १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची मोठी भर पडली आहे. (latest marathi news)

SAKAL Impact
Anil Patil News : निम्न तापी पाडळसे प्रकल्पासाठी केंद्रीय जलआयोगाची मान्यता : मंत्री अनिल पाटील

राज्यातील दुर्मीळ उदाहरण

राज्यात उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीसाठी काही निकष व अटी राज्य शासनाने घातल्या आहेत. त्यात इतर जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील अंतर, रुग्णसंख्या आदी बाबी विचारात घेतल्या जातात. त्यानंतर सुरवातीला ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले जाते.

चाळीसगाव ते जळगावचे अंतर, जिल्ह्यातील मोठा तालुका असल्याने तसेच प्रसूतीमध्ये देखील तालुक्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक असल्याने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे ३० खाटांवरून ५० खाटा ऐवजी थेट १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन करण्याची मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली होती.

केवळ मागणी करूनच ते थांबले नाहीत तर त्याबाबतचा आवश्यक तो प्रस्ताव त्यांनी राज्य शासनाकडे पाठवला. त्यात वेळोवेळी आलेल्या त्रुटी दूर केल्या. तसेच ५० ऐवजी १०० खाटाच कशा योग्य आहेत हे शासनाला पटवून दिले. त्यामुळे राज्य शासनाने विशेष बाब म्हणून चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे ३० खाटावरून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय घेतला. असे उपजिल्हा रुग्णालयाचे हे एक दूर्मीळ उदाहरण आहे.

‘सकाळ’च्या वृत्ताची दखल

दै. ‘सकाळ’ने २९ फेब्रुवारीच्या अंकात ‘चाळीसगावला व्हावे उपजिल्हा रुग्णालय’ या शिर्षकाखाली वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध केले होते. ज्यात चाळीसगावचा वाढता विस्तार लक्षात घेता, या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची का गरज आहे, याची माहिती दिली होती. त्यावेळी या विषयावर आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘विकासकामांचा जो शब्द मी देतो, तो पूर्ण करतो. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय आपण कुठल्याही परिस्थितीत मंजूर करुन आणू’ असे ठाणपणे सांगितले होते.

SAKAL Impact
Jalgaon News : टोल सुरू होण्यापूर्वीच नाक्याची जाळपोळ; पोलिसात गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com