SSC Exam : दहावीची परीक्षा उद्यापासून, 57 हजार परीक्षार्थी; 9 भरारी पथकांची नियुक्ती

SSC Exam : जिल्ह्यात दहावीची परिक्षा येत्या एक मार्चपासून सुरु होत आहे.
SSC Exam
SSC Exam esakal

Jalgaon News : जिल्ह्यात दहावीची परिक्षा येत्या एक मार्चपासून सुरु होत आहे. यंदा दहावीसाठी ५७ हजार ११० परिक्षाथी आहेत. त्यात मुले ३२ हजार ३७८ तर मुली २४ हजार ७३२ आहेत. या परिक्षेसाठी १४३ परिक्षा केंद्रे आहेत. ७९९ शाळा यासाठी आरक्षीत करण्यात आहेत.

कॉपी मुक्त परीक्षेसाठी नऊ भरारी पथके नियुक्त केली आहेत. नेमलेल्या नऊ भरारी पथकात प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, महिला अधिकारी, आदी विभागाची पथके तयार करण्यात आली आहेत. एका पथकात सात ते आठ अधिकारी आहेत. (10th class examination in district is starting from March 1)

परिक्षे दरम्यान परिक्षा केंद्राबाहेरील दीडशे मिटर परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. विद्यार्थ्यांना साडेदहालाच परिक्षा केंद्रात यावे लागणार आहे. परिक्षा काळात पोलिस, होमगार्ड, महसूल विभागाचे पथक, शिक्षण विभागाचे पथक व इतर नऊ पथके असणार आहेत. कॉपी मुक्त अभियानासाठी जिल्ह्यात सर्वच संबंधितांनी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

पहिला पेपर मराठीचा

दहावीची लेखी परिक्षा १ मार्च पासून सूरू होत आहे. १ मार्चला (शुक्रवार) मराठीचा पेपर आहे. वेळ अकरा ते दोन अशी आहे. ७ मार्चला इंग्रजी, ९ ला हिंदी, १३ मार्चला गणित-१, पंधरा मार्चला गणित -२, १८ मार्चला सायन्स व टेक्नॉलॉजी -१, २० मार्चला- सायन्स व टेक्नॉलॉजी -२, २२ ला सोशल सायन्स-१, २६ ला सोशल सायन्स २ या विषयाचा पेपर आहे. (latest marathi news)

..दृष्टीक्षेपात

दहावीचे परीक्षार्थी

दहावीसाठी ५७ हजार ११०

मुले--३२ हजार ३७८

मुली--२४ हजार ७३२

एकूण--५७ हजार ११०

या परिक्षेसाठी १४३ परिक्षा केंद्रे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com