Jalgaon News : पेपर अवघड गेल्याने भुसावळ येथील बारावीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon : शहरातील समृद्धी पार्क येथे राहणाऱ्या बारावीतील विद्यार्थ्याने इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याच्या नैराश्यातून राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Dead
Dead esakal

Jalgaon News : शहरातील समृद्धी पार्क येथे राहणाऱ्या बारावीतील विद्यार्थ्याने इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याच्या नैराश्यातून राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.२७) दुपारी उघडकीला आली आहे. इदांत पंकज मंडलेचा (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

शहरातील समृद्धी पार्क येथे इदांत पंकज मंडलेचा हा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होता. तो यावर्षी बारावीच्या वर्गात शिक्षण करीत होता. (12th student from Bhusawal to an extreme step a paper becomes difficult)

Dead
Mumbai Crime: पोलिसांना मिळाली टीप अन् 'त्या' आठ परदेशी नागरिकांना झाली अटक!

काही दिवसांपासून बारावीची परीक्षा सुरू आहे. यामध्ये इदांत मंडलेचा याने देखील परीक्षा देण्याची तयारी केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याने बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर दिला होता. परंतु हा पेपर त्याला अवघड गेल्याने तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता.

दरम्यान, त्याने मंगळवारी (ता.२७) राहत्या घरात कोणीही नसताना छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाइकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.

या घटनेबाबत रात्री भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी गणेश चौधरी तपास करीत आहेत. (latest marathi news)

Dead
Nagpur Crime: २१ जणांनी घरात घुसून केली होती इसमाची हत्या, मुख्य आरोपीला सापळा रचून अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com