Jalgaon News : पारोळा पालिकेचा 16 लाख शिलकीचे अंदाजपत्रक सादर

Jalgaon : नगरपालिकेचा ११९ कोटी ६९ लाख २२ हजार रुपये तरतूद असलेले व १६ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण यांनी मंजूर केले.
Parola Municipal Building.
Parola Municipal Building.esakal

Jalgaon News : येथील नगरपालिकेचा ११९ कोटी ६९ लाख २२ हजार रुपये तरतूद असलेले व १६ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण यांनी मंजूर केले.

पालिकेच्या पदाधिकाऱ्यांशिवाय सादर होणारे यंदाचे तिसरे अंदाजपत्रक असून, २०२४-२५ या वित्तीय वर्षाच्या अंदाजपत्रक मंजुरीसाठी मुख्याधिकारी तथा प्रशासक चव्हाण यांच्याकडे लेखाधिकारी राहुल साळवे व लेखापरीक्षक दीपक महाजन यांनी सुपूर्द केले. (Jalgaon 16 lakh balance budget of Parola Municipal presented)

पालिकेचे प्रशासक चव्हाण यांनी त्यास मंजुरी दिली. यात महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाभियान अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी या वर्षी २८ कोटी निधीची तरतूद करण्यात आली. दिव्यांगांसाठी ९ लाख, दुर्बल घटक व महिला बालकल्याणासाठी ९ लाख अशा विशेष तरतुदी अंदाजपत्रकात दिसून आल्या.

पाणी पुरवठ्यासाठी ५१ लाख, दिवाबतीसाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून होणारी तूट शॉपिंग सेंटरच्या उत्पादनातून भरून काढली जाणार आहे. आरोग्य सुविधांसाठी ६६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (latest marathi news)

Parola Municipal Building.
Jalgaon Municipality News : फुले मार्केट गाळे भाडे, अतिक्रमण प्रश्‍नावर लवकरच ‘तोडगा’

त्याचबरोबर पारोळा शहरासाठी प्रस्तावित महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाभियान अंतर्गत भुयारी गटार योजनेसाठी ३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या वेळी कार्यालय अधीक्षक संघमित्रा संदानशिव, अभियंता सुमित पाटील, सहाय्यक ग्रंथपाल अभिजित मुंदाणकर, आस्थापना लिपिक श्री. ज्ञानेश्वर उपस्थित होते.

"पालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध आहे. येणाऱ्या वित्तीय वर्षात सर्व समावेशक गरजांना चालना देण्यासाठी हे अंदाजपत्रक विकासाभिमुख आहे."- किशोर चव्हाण, प्रशासक तथा मुख्याधिकारी

Parola Municipal Building.
Jalgaon Water Scarcity : पाणी टंचाईच्या झळा सुरू; 22 गांवाना 26 टँकरने पाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com