Jalgaon News : तापी पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या 2 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू

Jalgaon News : शिरागड (ता. यावल) येथील तापी किनाऱ्यावरील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या जळगाव येथील दोन सतरा वर्षीय युवकांचा तापी नदी पात्रात अंघोळीसाठी उतरताच खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला.
Prathamesh Sonawane, Rohan Shrikhande
Prathamesh Sonawane, Rohan Shrikhandeesakal

यावल : शिरागड (ता. यावल) येथील तापी किनाऱ्यावरील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या जळगाव येथील दोन सतरा वर्षीय युवकांचा तापी नदी पात्रात अंघोळीसाठी उतरताच खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. १५) दुपारी एकच्या सुमारास घडली. दोघा युवकांच्या अकस्मात मृत्यूने जळगावसह यावल तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Jalgaon 2 youths who went for bath in tapi river vessel drowned)

यावल- जळगाव तालुक्याच्या सीमेवरील तालुक्यातील तापी नदीच्या किनारी शिरागड येथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. सध्या चैत्र नवरात्री उत्सव सुरू असल्याने तेथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. यानिमित्ताने आलेले अनेक भक्त हे तापी नदीत अंघोळ करतात.

दरम्यान, सोमवारी (ता. १५) दुपारी येथे रोहन काशिनाथ श्रीखंडे (वय १७, रा. रामानंदनगर, जळगाव) व प्रथमेश शरद सोनवणे (वय १७, रा. वाघनगर, जळगाव) हे दोघे आले होते. त्यांनी दुपारी एकला देवीचे दर्शन घेतले व त्या नंतर ते तापी नदीत अंघोळ करण्यास गेले.

Prathamesh Sonawane, Rohan Shrikhande
Odisha Bus Accident: काळरात्र! खचाखच भरलेली बस पुलावरून कोसळली; दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर 40 जण गंभीर जखमी

दरम्यान, दोनच्या सुमारास अचानक दोघे पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाले. तेव्हा तातडीने त्यांना तिथून नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले व यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले.

या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात शरद शिवराम सोनवणे यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी, भरत कोळी तपास करीत आहेत.

Prathamesh Sonawane, Rohan Shrikhande
Accident News: भरधाव जाणाऱ्या रिक्षाने मेट्रो क्रेनला दिली धडक अन्...., भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com