Jalgaon Water Crisis : जिल्ह्यातील धरणात 30 टक्के पाणीसाठा! गतवर्षीपेक्षा 10 टक्के पाणीसाठा कमी, पावसाची प्रतिक्षा

Jalgaon News : गेल्या वर्षाशी तुलना करता हा साठा दहा टक्क्यांनी कमी असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे.
Dam
Dam esakal

गणपूर (ता चोपडा) : जळगाव जिल्ह्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पात गेल्या महिन्याभरात मोठी घट झाली असून या प्रकल्पांमध्ये जेमतेम २८ ते ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षाशी तुलना करता हा साठा दहा टक्क्यांनी कमी असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. (Jalgaon 30 percent water storage in dam in district)

तापी नदीवरील हतनुर धरणात सद्यस्थितीला २९ टक्के तर गिरणा धरणात १२.६० टक्के पाणीसाठा आहे. वाघूर धरणामध्ये ५९ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी गेल्या वर्षाची तुलना करता या तारखेला हातनूर मध्ये ४५ टक्के गिरणा मध्ये २४ टक्के तर वाघूर मध्ये ६४.४७ टक्के पाणीसाठा होता.

जिल्ह्यातील अभोरा ,मंगरूळ, सुकी, मोर, गुळ, बहूळा, बोरी, भोकरबारी, तोंडापूर, अग्नावती, अंजनी, मन्याड व शेळगाव बॅरेज मधील एकूण पाणीसाठयाची क्षमता ३१४. २५ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मात्र तापमान वाढीचे संकट ओढवल्याने आणि कमी पावसाळे होत असल्याने सिंचन प्रकल्पामध्ये जेमतेम २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पाची अवस्था तळ गाठू लागली असून त्यात जेमतेम १५.६६ टक्के पाणीसाठा सद्यस्थितीत आहे. (latest marathi news)

Dam
India Lok Sabha Election Results Live : महाराष्ट्र, यूपी-बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का; राममंदिर फॅक्टर फसला?

गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा दहा टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगितले जाते.अजूनही पावसाळा सुरू होण्यास उशीर असल्यामुळे आणि सुरुवातीचा साधारण पाऊस पडल्यानंतर पाणीसाठा वाढण्याची शक्यता कमीच असल्याने मोठा पाऊस झाल्यावर या प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होईल.

अलीकडे मार्च एप्रिल पासूनच धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागतो तो मे मध्ये उन्हाच्या तडाख्याने फारच खालावतो. चोपडा तालुक्यातील गुल मध्यम प्रकल्प व शेळगाव प्रकल्पात,मोर ,सुकी,आभोना,मंगरूळ हे प्रकल्प वगळता जवळपास सर्व प्रकल्पात पाणीसाठ्याची स्थिती जेमतेम झाली आहे.

"जिल्हा लगत असलेल्या अनेर मध्यम प्रकल्पात उजवा व डाव्या कालव्यात खरीप पूर्व कपाशी लागवडीसाठी पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर आज २१०.५० मीटर म्हणजेच १७.५० दश लक्ष घनमीटर म्हणजे ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे."

- पी.बी. पाटील (उप विभागीय अभियंता जलसंपदा)

Dam
Mandi Constituency Lok Sabha Election Result: क्विननं मारली बाजी; मंडीमधून कंगना रनौत विजयी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com