Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : भुसावळ विधानसभा मतदारसंघात 316 केंद्रे : प्रांताधिकारी जितेंद्र पाटील

Latest Vidhan Sabha Election 2024 News : प्रांताधिकारी पाटिल पुढे म्हणाले की, भुसावळ विधानसभा मतदारसंघात एकूण ३१६ मतदान केंद्रे आहेत. मतदारसंघात तीन लाख १४ हजार २३ मतदार आहेत.
District Officer Jitendra Patil, Tehsildar Neeta Labde while giving information in the press conference.
District Officer Jitendra Patil, Tehsildar Neeta Labde while giving information in the press conference.esakal
Updated on

भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे. एकूण ३१६ मतदान केंद्रांसाठी तीन हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत एखाद्या कर्मचाऱ्याने हलगर्जीपणा केला अथवा आचारसंहितेचा कोणी भंग केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी तहसीलदार निता लबडे व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (316 centers in Bhusawal Assembly election Constituency)

प्रांताधिकारी पाटिल पुढे म्हणाले की, भुसावळ विधानसभा मतदारसंघात एकूण ३१६ मतदान केंद्रे आहेत. मतदारसंघात तीन लाख १४ हजार २३ मतदार आहेत. त्यात पुरूष मतदार एक लाख ६० हजार ९०८, महिला एक लाख ५३ हजार ०७५, तृतीयपंथी मतदार ४०, दोन हजार ५९९ दिव्यांग मतदार आहेत.

सीनियर सिटीझन मतदार तीन हजार १७३ आहेत. १८ ते २६ वयोगटातील तरुण मतदार सहा हजार ७४३ एकूण मतदार तीन लाख १४ हजार २३ त्याचबरोबर नवीन मतदारांनी आपली नामनिर्देशनपत्र भरून दिली आहेत. अशा मतदारांची यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

जे फक्त बेडवर आजारी अवस्थेत असलेले व ८५ वर्षे वयोगटातील किंवा वर असतील, अशा मतदारांची सेवटर अधिकारी व कर्मचारी खात्री करतील, त्यानंतर त्यांचे मतदान करून घेतील. आचारसंहिता कक्षेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले, तर ग्रामीण भागात बीडीओ असतील.

नागरिकांच्या शंकांचे समाधान काही चौकशीसंदर्भात मतदान मदत कक्षाचे अधिकारी करतील. सर्व सेक्टर अधिकारी ३० अतिरीक्त चार आहेत. पोलिस सेक्टर अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. एफएसटी, व्हीएसटी, व्हीव्हीटी या पथकांची नियुक्ती झालेली आहे.

निवडणूककामी क्षेत्रीय अधिकारी ३०, राखीव क्षेत्रीय अधिकारी चार असे एकूण ३४ अधिकारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, सहाय्यक, शिपाई व पोलिस कर्मचारी असे एकूण तीन हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

हे सर्व कर्मचारी निवडणूकप्रक्रिया पूर्ण करणार आहेत. बीएलओ, स्वयंसेवक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानप्रक्रियेसाठी भरारी पथके, व्हिडीओ सर्विलन्स व्हिडीओ, व्हीव्हीग, खर्च पथक अशा पथकांची नेमणूक केली आहे. (latest marathi news)

District Officer Jitendra Patil, Tehsildar Neeta Labde while giving information in the press conference.
Jalgaon: अधीक्षक कार्यालयात ‘फुकट फौजदार’ वाढले! टंगळमंगळ करणारे मजेत, प्रामाणिकांवर भार; दांडीबहाद्दर ‘बाबुगिरी’ला एसपींचा दणका

सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

मतदान प्रक्रीयेसाठी महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक, एसटी बसगाड्या १९, टेम्पो ट्रव्हलर ६५, स्कूल बस दहा, सेक्टरच्या ४०, जीपगाडया तीन या प्रक्रीयेसाठी विविध एकूण १४१ वाहने तयार आहेत. मतदान करताना मतदाराला छायाचित्र असणारे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.

यात पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स, शासनाचे कार्ड, बँक पासबूक, पॅनकार्ड, आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, मनेरेगा (रोजगार) कार्ड, हेल्थ कार्ड, इन्श्युरन्स कार्ड, पेन्शन कार्ड या ओळखीच्या पुराव्यांचा समावेश असल्याची माहिती देवून निवडणूक कालावधीत एखाद्या कर्मचाऱ्याने हलगर्जीपणा केला अथवा आचारसंहितेचा कोणी भंग केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. याबरोबरच सर्व कर्मचाऱ्यांची निवडणूक कामाकरिता प्रशिक्षण घेण्यात येत असल्याचे जितेंद्र पाटिल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

District Officer Jitendra Patil, Tehsildar Neeta Labde while giving information in the press conference.
Government Recruitment 2024: पुढच्या आठवड्यात गट ब अन् गट क पदांसाठी मोठी भरती; फडणवीसांची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com