Jalgaon Bhavani Mata Yatra : भवानी माता यात्रोत्सवाला 5 दिवस परवानगी; यंदाची यात्रा उत्साहात

Jalgaon News : सुरतेची लूट केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आशीर्वाद घेतलेल्या, मुक्कामी राहिलेल्या धरणगाव येथील भवानी माता मंदिराला यात्रोत्सवासाठी चैत्र महिन्यात पाच दिवसांची परवानगी मिळाली आहे.
Pattern of Yatra in Bhavani Mata Temple area.
Pattern of Yatra in Bhavani Mata Temple area.esakal

धरणगाव : सुरतेची लूट केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आशीर्वाद घेतलेल्या, मुक्कामी राहिलेल्या धरणगाव येथील भवानी माता मंदिराला यात्रोत्सवासाठी चैत्र महिन्यात पाच दिवसांची परवानगी मिळाली आहे. या मंदिराला तसेच सांडेश्र्वर महादेव मंदिराला शिवाजी महाराजांनी भेट दिल्याची इतिहासात नोंद आहे. (Jalgaon 5 days allowed for Bhavani Mata Yatra Festival)

शहरासह परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या भवानी मातेच्या ऐतिहासिक यात्रोत्सवाचे आयोजन या पुढे दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या पाच दिवस आधी होणार आहे. दरवर्षी चैत्र आणि अश्विन महिन्यात नवरात्र उत्सव या मंदिरामध्ये साजरा केला जात असतो. हा ऐतिहासिक यात्रोत्सवाला यंदा भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला.

त्या साठी ज्येष्ठ सल्लागार हेमलाल भाटिया, सतीश असर यांच्या नेतृत्वाखाली मातेचे शेकडो सेवेकरी दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. पाच दिवस चालणारा हा यात्रोत्सव म्हणजे महिला, अबाल वृद्धांसाठी भक्ती आणि मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे. यात्रेदरम्यान सुरक्षेचे सर्व खबरदारी आयोजकांकडून घेतले जात आहे.

यात्रोत्सवासंदर्भात सेवेकऱ्यांना कोणतीही अडचण, समस्या असेल तर आठ, दहा जण दररोज रात्री नऊ ते दहापर्यंत मंदिर परिसरात उपस्थित राहणार आहेत. रोजच्या रोज प्रत्येक सेवेकऱ्यांकडून त्यांनी घेतलेल्या जबाबदारीचा आढावा घेतला जात आहे. या यात्रोत्सवासाठी सतीश असर यांच्यासह मंदिर परिसरातील शेतकऱ्यांनी आपले शेत रिकामे करून दिले आणि दरवर्षी यात्रेचे आधी येणारे पिके घ्यावीत आणि यात्रेसाठी शेत खुला करून द्यावे. (latest marathi news)

Pattern of Yatra in Bhavani Mata Temple area.
Jalgaon News : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी 16 भरारी पथकांची स्थापना

असे आवाहन देखील या शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणात लहान मुलांसाठी खेळणे, झुले, पाळणे, मिठाईची दुकाने, लाकडी, मातीची साहित्य अशा विविध प्रकारचे दुकान थाटली होती. पहिल्याच वर्षी मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांचा आणि सेवेकरांच्या प्रतिसाद मिळाल्याने पुढील वर्षी व्यापक स्वरूपात नियोजन करावे लागेल.

अशी देखील चर्चा या यात्रोत्सवात होती. मंदिरात भूरा काका,जयराम महाजन हे सेवेकरी सेवा करीत असतात. ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या दर्जासाठी प्रयत्न व परिसराचा विकास करण्याबाबत एका बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत चर्चा झाली.

साखर भवानीची यात्रा

या यात्रोत्सवाला पूर्वी साखर भवानीची यात्रा म्हणत असत. यात्रेत साखरेपासून बनविलेले पक्षी, प्राणी असे विविध पदार्थ विक्रीला असत. हे पदार्थ खरेदी केल्यानंतर साधारण पाव हिस्सा प्रसाद म्हणून भाविक मंदिरात देत असायचे. श्रद्धेने मागणार ते भाविकांना मिळणारच अशी या भवानी मातेची अख्यायिका आहे.

साधारण चारशे पाचशे वर्षांपूर्वी असलेल्या भवानी माते मंदिराचा जीर्णोद्धार देखील सुरू असून राजस्थानातील नामवंत कारागीर काम करीत आहेत. यासाठी सतीश असर, उद्योजक जीवनसिंह बायस, गोटू काबरा, दत्तू चौधरी यांच्या मार्गदर्शनात निधी संकलन आणि मंदिराचे काम प्रगतिपथावर आहे, मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्यावर एक मोठा याग १०० ब्राह्मणांच्या उपस्थित करण्याचे नियोजन देखील आहे

Pattern of Yatra in Bhavani Mata Temple area.
Jalgaon News : चोपड्याला 27 हजार मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी; तालुका खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com