Jalgaon Municipality News : शहरातील 600 सार्वजनिक शौचालयाचे सीटस तोडणार

Jalgaon Municipality : शहरातील विविध भागात वापरात नसलेले व जीर्ण झालेल्या सार्वजनिक शौचालयाचे सहाशे सीटस तोडण्यात येणार आहेत.
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation esakal

Jalgaon Municipality News : शहरातील विविध भागात वापरात नसलेले व जीर्ण झालेल्या सार्वजनिक शौचालयाचे सहाशे सीटस तोडण्यात येणार आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत आदेश दिले आहेत. विनामूल्य तोडून तेथील भंगार साहित्य घेऊन जाण्याच्या अटीवर हा मक्ता देण्यात आला आहे.

जळगाव शहरातील विविध भागात महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहेत. मात्र त्यातील काही शौचालय अत्यंत जीर्ण झाले असून ते वापरातही नाहीत. (Jalgaon 600 unused and dilapidated public toilets will be demolished)

त्याच्यावर साफसफाईचा खर्च करणेही परवडत नसल्याने महापालिकेने हे शौचालय पाडण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेच्या महासभेत हा निर्णय मंजूर करण्यात आला होता. महापालिकेच्या स्वच्छ भारत योजनेतर्गत हगणदारी मुक्त शौचालय करण्यासाठी २०११ च्या अहवालानुसार जळगाव शहर महापालिका हद्दीत ९९२२ कुंटूबांकडे वैयक्तीक शौचालय नसल्याचे आढळून आले होते.

तसेच २०१५ च्या सर्वेक्षणातर्गंत ९७५९कुंटूबाकडे वैयक्तीक शौचालय नसल्याचे आढळून आले.त्यापैकी ३४२३ कुंटूबे सार्वजनिक शौचालयावर अवलंबून होती. त्यानंतर स्वच्छ भारत अभियांनातर्गत शौचालय बांधण्यास प्रोत्साहन देण्यात आले. त्या अंतर्गत आठ हजार लाभार्थींनी वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे.

त्यामुळे सार्वजनिक शौचालय वापरणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. त्या अंतर्गत अनावश्‍यक सीटस निष्कासीत करण्याचा अहवाल स्वच्छता निरिक्षक व मुख्य स्वच्छता निरिक्षक यांच्याकडून मागविण्यात आला.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Banana Crop Insurance : केळी पीक विम्याची 6 हजार प्रकरण मंजूर : जिल्हाधिकारी प्रसाद

त्यानुसार प्रभाग समिती एक ते चार मधील ५१ तटावरील २०४२ सिटसपैकी वापरात अनावश्‍यक नसलेल्या व जीर्ण झालेल्या २६ तटावरील ६६१ सीटस निष्कासीत करण्यास महापालिकेच्या महासभेने मान्यता दिली होती. यात शिवाजी नगर लाकूड पेठ भागातील २० सार्वजनिक शौचालय सीटस निष्कासीत करण्यात येणार आहे.

महासभेत मान्यता दिल्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने या ६६१ सीटस निष्कासीत करण्याचे आदेश दिले आहेत. या तोडण्याचा मक्ता देण्यात आला असून मक्तेदाराने त्या सीटस विनामूल्य तोडून द्यायचे असून त्यातील भंगार त्यानेच घेऊन जायचे या अटीवर हा मक्ता देण्यात आला आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Unseasonal rain Damage : पारोळा, रावेर, अमळनेर तालुक्यात गारपीट; रब्बी हंगाम धोक्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com