Jalgaon Polling Staff Training: तंत्रशुद्धतेसाठी 888 कर्मचारी प्रशिक्षित! चाळीसगावला मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

Jalgaon News : लोकसभेच्या मतदानावेळी ‘ईव्हीएम’ मशीन तंत्रशुद्ध पद्धतीने वापरता यावे, यासाठी रविवारी (ता. १४) येथे नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण घेण्यात आले.
Officers and employees were given special training so that EVMs can be used in a technically sound manner
Officers and employees were given special training so that EVMs can be used in a technically sound manneresakal

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : लोकसभेच्या मतदानावेळी ‘ईव्हीएम’ मशीन तंत्रशुद्ध पद्धतीने वापरता यावे, यासाठी रविवारी (ता. १४) येथे नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. तालुक्यातील ८८८ केंद्राध्यक्ष आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी यात सहभागी झाले. उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले यांनी प्रशिक्षण दिले. (Jalgaon 888 staff trained for technical accuracy marathi news)

लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी मोठी मनुष्यबळाची यंत्रणा काम करीत असते. या मनुष्यबळ यंत्रणेला योग्य ते प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. ईव्हीएम ऑपरेशन्स प्रक्रियेमध्ये कोणतीही तांत्रिक चूक होऊ नये, अथवा मतदान बूथवर जाणारे सर्व कर्मचारी प्रशिक्षित असावेत,

यासाठी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात सर्व मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम पोलिंग ऑफिसर यांना ईव्हीएमचे मॉक ड्रिल करून घेण्याचे नियोजन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, डॉ. संदेश निकुंभ, निवडणूक नायब तहसीलदार यांनी केले.

या प्रशिक्षणात शिक्षक, प्राध्यापक, विविध विभागांचे सरकारी कर्मचारी यांचे ईव्हीएम मशीनवरील हँड्स ओन ट्रेनिंग त्याचबरोबर मतदान प्रक्रियेतील महत्त्वाचे फॉर्म्स समजावून व भरून घेण्याचे काम या दोन दिवसांमध्ये करण्यात आले आहे.  (latest marathi news)

Officers and employees were given special training so that EVMs can be used in a technically sound manner
Loksabha Election: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत यांना आव्हान कोणाचं? नारायण राणे, किरण सामंत यांच्या नावाची चर्चा

यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, डॉ. संदेश निकुंभ, निवडणूक नायब तहसीलदार, गटशिक्षण अधिकारी विलास भोई, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विजय बोरसे, जिल्हा परिषद उपअभियंता चंद्रकांत शिंपी, अन्सार शेख, सहाय्यक गट विकास अधिकारी, अनिल बैसाणे, उपअभियंता, तुशांत अहिरे, सागर चव्हाण, संगणक परिचालक निवडणूक शाखा हे आदी उपस्थित होत.

प्रशिक्षणार्थींना प्रशस्तिपत्रक

या प्रशिक्षणात अध्ययन ते अध्यापन, चर्चासत्रातून प्रशिक्षण, शंका निरसन, प्रात्यक्षिकावर भर, मॉक ड्रिल, तोंडी परीक्षा परीक्षा आदी मुद्द्यांवर भर देण्यात आली. प्रशिक्षणासाठी सेक्टर ऑफिसर्स व ट्रेनर म्हणून विविध विभागातील वर्ग एक वर्ग दोनचे अधिकारी तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांनी काम पाहिले आहे. विशेष प्राविण्यासह यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Officers and employees were given special training so that EVMs can be used in a technically sound manner
Loksabha 2024: निवडणूक काळात चार्टर्ड विमाने, हेलिकॉप्टरला डिमांड; जाणून घ्या तासाला किती रुपये देताहेत तुमचे आवडते पक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com