Jalgaon News : हवामान तज्ज्ञांच्या मते यंदा भरपूर पाऊस! खानदेशातील शेतकरी अजूनही नक्षत्रांच्या भरवशावरच

Jalgaon : ग्रामीण भागातील शेतकरी आजही पावसाळ्यातील नक्षत्रांवर भरोसा ठेऊन नक्षत्राचे वाहन कोणते, त्यानुसार तो पावसाच्या आशेवर असतो.
rain
rainesakal

ॲड.बाळकृष्ण पाटील : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : यंदाचा पावसाळा चांगला असेल, असे राज्यातील अनेक हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले असले, तरी ग्रामीण भागातील शेतकरी आजही पावसाळ्यातील नक्षत्रांवर भरोसा ठेऊन नक्षत्राचे वाहन कोणते, त्यानुसार तो पावसाच्या आशेवर असतो. येत्या शनिवारी (ता. २५) रोहिणी नक्षत्राला सुरवात होईल. बऱ्याचदा रोहिणी नक्षत्रात थोडा पाऊस पडला, तरी मृग नक्षत्र कोरडे जाते, असा गेल्या ४० वर्षांचा अनुभव शेतकऱ्यांचा आहे. ( According to weather experts there will be lot of rain this year )

गेल्या एक-दोन दशकांपासून खरे म्हणजे जूनमधील पाऊस बेभरवशाचा झाल्यामुळे कोरडवाहू पेरण्या जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यातच झाल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. तरीही अलीकडच्या काळात तंत्रज्ञान खूप पुढे गेल्याने हवामान तज्ज्ञांनी दिलेले अंदाज बऱ्यापैकी निघत असल्याचे पाच ते दहा वर्षांत दिसून आले आहे.

शेतकरी ७ जूनला मृग नक्षत्र येईल. त्या हिशोबाने कोरडवाहू क्षेत्रात धूळपेरणी करतो. पावसाच्या भरवशावर कोरड जमिनीत बियाणे टाकण्यात अनेक शेतकऱ्यांचा कल असतो. हवामान तज्ज्ञांचे अंदाज वर्तविण्याचे तंत्रज्ञान बऱ्यापैकी विकसित झाले आहे. तरीही शेतकरी पंचांगाचा आधार घेतात. पेरणीसाठी पंचांग पाहणारे अनेक शेतकरी खानदेशात आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांचा पूर्वापार चालत आलेल्या आडाख्यांवर आजही भरोसा आहे, हे सिद्ध होते. तसे पाहता अलीकडे जूनमध्ये फारसा पाऊस होत नाही. जुलै आणि ऑगस्टमध्ये पाऊस होतो आणि सप्टेंबरमध्ये काहीसा पाऊस होऊन ऑक्टोबरपर्यंत पाऊस टिकून असतो. गेल्या दशकात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढल्याचे दिसते. (latest marathi news)

rain
Jalgaon News : वन्य प्राण्यांचा हल्ल्यात 25 लाखांपर्यंत मदत; पाणी, अन्नाच्या कमतरतेने प्राण्यांची गावाकडे धाव

नक्षत्रांवर भिस्त

यंदा ७ जूनला मृग नक्षत्र सुरू होत असून, त्याचे वाहन कोल्हा आहे. म्हणजे ७ जूनला सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होईल. त्यानंतर २९ जूनला आर्द्रा नक्षत्र सुरू होत असून, त्याचे वाहन मोर आहे. अलीकडच्या दोन-चार दशकांचा विचार करता बऱ्याचदा पेरण्या आर्द्रात (आर्दळ) झाल्याचे दिसून आले आहे. ५ जुलैला पुनर्वसू नक्षत्र सुरू होत असून, त्याचे वाहन हत्ती आहे. १९ जुलैला पुष्य नक्षत्र सुरू होणार असून, त्याचे वाहन बेडूक आहे.

बेडूक वाहनाचा विचार करता या नक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस होईल, असा अंदाज शेतकरी लावतात. ३ ऑगस्टला आश्लेषा नक्षत्र सुरू होणार असून, त्याचे वाहन गाढव आहे. १६ ऑगस्टला मघा नक्षत्र सुरू होणार असून, त्याचे वाहन कोल्हा आहे. ३० ऑगस्टला पूर्वा नक्षत्र सुरू होणार असून, त्याचे वाहन उंदीर आहे. १३ सप्टेंबरला उत्तरा नक्षत्र सुरू होणार असून, त्याचे वाहन हत्ती आहे.

उत्तर नक्षत्रात पाऊस झाल्यास हंगाम चांगला येतो, अशी शेतकऱ्यांना पूर्वापार आशा आहे. २६ सप्टेंबरला हस्त नक्षत्र सुरू होणार असून, त्याचे वाहन मोर आहे. १० ऑक्टोबरला चित्रा नक्षत्र सुरू होणार असून, त्याचे वाहन म्हैस आहे. नक्षत्राच्या स्थितीनुसार हवामान आणि वातावरणाचा बदल पीक आणि पाण्यासाठी फायदेशीर किंवा परिणाम करणारा ठरतो. त्यामुळे शेतकरी आजही पंचांगात दिलेल्या नक्षत्र व त्यांच्या वाहनांची पाहणी करतात.

पूर्वापार चालत आलेल्या संकेतानुसार पूर्वा नक्षत्रात पोळा आल्यास हंगाम चांगला येतो, असे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. खानदेशी भाषेत पुरभे बैल जेवल्यास हंगाम चांगला येईल, हा शेतकऱ्यांचा अनुभव बऱ्याचदा खरा ठरला आहे. तरीही ‘शेतकरी शेवटी आशेवर जगतो’, ही खानदेशी म्हण लक्षात घेता या वर्षाचे नक्षत्र शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

rain
Jalgaon News : मोठे वाघोदा गॅस्ट्रो रुग्णसंख्या 38 वर! आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायतीची धावपळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com