Farmer suicide
Farmer suicideesakal

Jalgaon Agriculture Update : नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Published on

मुक्ताईनगर : सालबर्डी (ता. मुक्ताईनगर) येथील एका तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे शेतातच विषप्राशन केले. दरम्यान, शुक्रवारी (ता. २८) मध्यरात्री उपचार सुरू असताना या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

सालबर्डी येथील ललित संजय झोपे (वय ३१) यांची साडेतीन एकर शेती आहे. सततची नापिकी व शेती पिकांवर उद्भवणारे नैसर्गिक आपत्तीचे संकट यातून आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली.(Jalgaon Agriculture Update Young farmer commits suicide due to lack of unproductivity Jalgaon News)

Farmer suicide
Jalgaon Political Update : शिवसेनेत 52 कार्यकर्त्यांचा प्रवेश

अखेर आर्थिक नुकसानीला कंटाळून या तरुण शेतकऱ्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना गुरुवारी (ता. २७) सकाळी उघडकीस आली. त्याची प्रकृती प्रचंड खालावल्याने उपचारार्थ जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

तेथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता २८) मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले असा परिवार असल्याने घरातील कुटुंब प्रमुख हरविल्याने झोपे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Farmer suicide
Jalgaon Political Update : जामनेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भाजपात दाखल !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com