Jalgaon Agriculture News: मृगाच्या दमदार पावसाची प्रतीक्षा! खरिपाची तयारी पूर्ण; शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

Jalgaon News : पेरणीसाठी दमदार पाऊस लागतो. तो अद्याप झालेला नाही. यामुळे शेतकरी दमदार पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.
Farmer plowing the field.
Farmer plowing the field. esakal

Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात ५ लाख ५८ हजार ३९२ हेक्‍टरवर कापसाची लागवड प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी पूर्ण केली असून, शेत पेरणी योग्य करून ठेवले आहे. केव्हा एकदाचा पाऊस येतो, अन्‌ पेरणीच्या कामाला लागतो, अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

७ जूनला मृग नक्षत्राचा पाऊस येतो. मात्र, तो अत्यल्प प्रमाणात झाला. पेरणीसाठी दमदार पाऊस लागतो. तो अद्याप झालेला नाही. यामुळे शेतकरी दमदार पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. काडी कचरा वेचून शेत पेरणीयोग्य करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. बैलजोडी लवकर उपलब्ध होत नसल्याने बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करून शेतात नांगरटी करीत आहेत.

बियाण्यांचा काळाबाजार?

जिल्ह्यात शेतकऱ्यांनी बीटी बियाण्यांची खरेदी सुरू केली आहे. मात्र, हव्या त्या कंपनीचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे. काही बियाण्यांचा काळाबाजार सुरू आहे, असे शेतकरी सांगतात. याबात शेतकरी तक्रार करीत नसल्याने कृषी विभागाला संबंधितांवर कारवाई करता येत नसल्याचे चित्र आहे.

कृषी विभागाचे सूक्ष्म नियोजन

खरीप हंगामासाठी प्रत्येक तालुकानिहाय पिकांचे सूक्ष्म नियोजन केले असून, त्यात जमीन तयार करण्यापासून ते बीज प्रक्रिया मोहीम राबविण्यापर्यंत, खतांचे नियोजन, व्यवस्थापन खतांचा वापर कमी करून कंपोस्ट खते व इतर ग्रीन मॅन्युअरिंग, अशा जैविक घटकांचा वापर करून व खर्च नियंत्रणात ठेवून, जमिनीचे आरोग्य टिकवून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढेल, यावर भर देण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. (latest marathi news)

Farmer plowing the field.
Latest Marathi News Live Update : काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची दिल्लीत भेट

पर्यायी पीक म्हणून ‘मका’

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी कापूस पिकाला पर्याय म्हणून जास्तीत जास्त क्षेत्रावर ‘मका’ पिकाची लागवड करण्याबाबत जिल्ह्यात जनजागृती सुरू आहे.

१८ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

खरीप हंगाम २०२४-२५ साठी कापूस व सोयाबीन वगळता ९ लाख ६८ हजार ६०५ हेक्टरसाठी १८ हजार ४३८ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात ५ लाख ५८ हजार ३९२ हेक्‍टरसाठी २७ लाख ९२ हजार बीटी बियाणे पाकिटांची मागणी नोंदविली आहे. त्यातील १८ लाख बियाणे पाकिटे प्राप्त झाली आहेत.

खतांचे आवंठन

खरीप हंगामासाठी ३ लाख ४० हजार टन खतांची मागणी केली आहे. यापैकी ३ लाख २३ हजार टन खतांचे व ७३ हजार २०० न्यानो युरियाचे आवंटन कृषी आयुक्‍तालयाकडून जिल्ह्यास मंजूर केले आहे. जिल्ह्यात बोगस बियाणे, बियाणे व खतांची जास्ती दराने विक्री होऊ नये, म्हणून बियाण्यांची गुणवत्ता नियंत्रणासाठी १६ भरारी पथके नियुक्‍त केले आहेत. ४२ निरीक्षक नियुक्‍त केले आहेत.

Farmer plowing the field.
Adhar Update: साडेचार लाख मुलांचे आधार अपडेट बाकी! बायोमेट्रिक पॅरामीटर्समध्ये होतात बदल; मोठ्यांचे आधार 10 वर्षांनंतर करा अपडेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com