Latest Marathi News | जळगाव : अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon amrut mission second stage Government approval

जळगाव : अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव

जळगाव : केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अभियानाच्या अमंलबजावणीसाठी प्रस्तावावर चर्चा करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सोमवारी (ता. ८) होणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

हेही वाचा: OBC मोर्चाचे लक्ष्मण हाके देणार शहाजीबापूंना टक्कर; शिवसेना प्रवेशानंतर आक्रमक

महापालिकेची सोमवारी दुपारी बाराला महासभा होणार आहे. सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही सभा होणार आहे. महापौर जयश्री महाजन पीठासीन अध्यक्षपदी असतील. या सभेत एकूण २९ विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यात प्रशासकीय १२, तर अशासकीय चार व स्थायी समितीकडून आलेले काही प्रस्ताव आहेत. महापालिकेत मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत जळगाव शहर महारपालिकेत विद्यावेतनावर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर शिकाऊ उमेदवारांच्या नेमणुकीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: मोदींमुळेच देश जागृत होतोय; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची स्तुतीसुमनं

केंद्र शासनाच्या अमृत टप्पा दोन योजनेंतर्गत अंबरझरा तलाव क्षेत्राचे पुनरूज्जीवन करण्यासाठी खर्चास मान्यता देणे, शासकीय विश्रामगृहातील जुने शौचालय तोडून नवीन ‘पे ॲन्ड यूज’ तत्वावर महिलांसाठी शौचालय बांधण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेणे, शहरातील विविध भागांतील रस्ता दुरुस्तीसाठी आवश्‍यक यंत्रसामुग्री खरेदी करणे, शहर अभियंत्यांना दहा लाखांपर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार प्रदान करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

Web Title: Jalgaon Amrut Mission Second Stage Government Approval

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..