Jalgaon Leopard
Jalgaon Leopardesakal

Jalgaon Leopard News : नांद्रा शिवारात बिबट्याचा धुमाकुळ! हरिणाचा पाडला फडशा

Jalgaon Leopard : नांद्रा बुद्रुक (ता. जळगाव) येथील शेतात मध्यरात्री बिबट्याने हरणाचा फडशा पाडला आहे.
Published on

Jalgaon Leopard News : नांद्रा बुद्रुक (ता. जळगाव) येथील शेतात मध्यरात्री बिबट्याने हरणाचा फडशा पाडला आहे. ही घटना बुधवारी (ता. १९) सकाळी उघडकीस आली. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नांद्रा शिवारातील गणेश रामचंद्र सोनवणे यांच्या शेतात साई मंदिराजवळ मृत्यूमुखी पडलेले हरण आढळले. (atmosphere of fear among farmers due to leopard in village)

शेतात बिबट्याच्या पायाचे ठसेही दिसल्याने बिबट्या परिसरातच असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे. दीड महिन्यापूर्वी नांद्रा गावातील एका शेतकऱ्याच्या वासरूचा फडशा बिबट्याने पाडला होता. पुन्हा हरणाचा फडशा पाडला आहे. सध्या खरीप हंगामाचे दिवस आहेत. यामुळे शेतकरी, शेतमजूरांना शेतात वखरणी, पेरणी करण्यासाठी जावे लागते. बिबट्याचे ठसे आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. (latest marathi news)

Jalgaon Leopard
Jalgaon Leopard News : बिबट्याच्या बछड्याची पॉलिहाऊसमध्ये घुसखोरी; तिरपोळे शिवार भयभीत

वन विभागाने घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, बिबट्याचा बंदोबस्त करण्याविषयी आश्‍वासन दिले नाही. नांद्रा परिसरात बागायती केळी आहे. बिबट्याला शेतात आसरा मिळू शकतो. तो केव्हाही पुन्हा प्राण्यांवर, नागरिकांवर हल्ला करू शकतो. या परिसरात हरणाचे अनेक कळप आहेत. ससे, लांडोरही आहेत. यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Jalgaon Leopard
Jalgaon Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com