पक्षकाराकडून वकिलाच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

या घटने मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही
jalgaon
jalgaongoogle
Updated on
Summary

या घटने मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

न्यायालय परिसरात पक्षकाराने वकिलास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून जळगावातील चाळीसगावात ही घटना घडल्याने काही काळासाठी न्यायालय परिसरात तणाव निर्माण झाला. कागद पत्र देण्यास उशीर केल्याच्या कारणावरून पक्षकाराने चक्क वकिलाच्या अंगावर पेट्रोल टाकल्याची घटना मोठी खळबळ उडाली आहे.

jalgaon
‘पीकें’नी धुडकाविला काँग्रेसचा प्रस्ताव

घडलेली घटना अशी की, जिल्ह्यातील चाळीसगाव येथे वकिली व्यवसाय करणारे एस. टी. खैरनार हे वकील नियमित कामकाज करण्यासाठी वकील चेंबरमध्ये बसले होते. त्याचवेळी त्यांचे पक्षकार असलेले 75 वर्षीय किसन सांगळे हे त्यांना भेटण्यासाठी वकील चेंबरमध्ये आले. यावेळी कागदपत्र देण्या-घेण्यावरून दोघांमध्ये किरकोळ स्वरूपाची बाचाबाची झाली. पूर्ण तयारीनिशी आलेल्या किसन सांगळे यांनी वकील खैरनार यांच्या अंगावर सोबत आणलेले पेट्रोल ओतून त्यांना माचिसने पेटवण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने वकील घाबरले आणि त्यांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला.

दरम्यान, शेजारी असलेल्या वकिलांनी त्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी, वकील खैरनार यांच्या अंगावर पेट्रोल पडल्याने त्यांना त्वचा विकाराचा त्रास आणि रक्तदाब वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले आले आहे. किसन सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या वर चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटने मागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, कागदपत्र देवाणघेवाण करण्यााठी उशीर झाल्याने हे कृत्य करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

jalgaon
तिसऱ्या महायुद्धासाठी चिथावणी देऊ नका; रशियाचा युक्रेनला इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com