Khandesh Natya Mahotsav : वेगळ्या आकृतिबंधातील नाटकांनाही प्रेक्षकांची दाद

Khandesh Natya Mahotsav : ठराविक चौकटीतील नाटक नसूनही वेगवेगळ्या आकृतिबंधातील प्रायोगिक नाटकांना प्रेक्षकांनी दाद दिली.
Pratiksha Khasnis performing smooth performance in play 'Kadekot' at Khandesh Theater Festival.
Pratiksha Khasnis performing smooth performance in play 'Kadekot' at Khandesh Theater Festival.esakal

Jalgaon News : ठराविक चौकटीतील नाटक नसूनही वेगवेगळ्या आकृतिबंधातील प्रायोगिक नाटकांना प्रेक्षकांनी दाद दिली. खानदेश नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 'व्हाया सावरगाव खुर्द' व 'कडेलोट' ही नाटके सादर झाली.

ओबेनॉल फाउंडेशन प्रस्तुत व उत्कर्ष कलाविष्कार तर्फे सुरु असलेल्या नानासाहेब फालक स्मृती खानदेश नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आसक्त या संस्थेचे दिनकर दाभाडे यांच्या कादंबरीवर आधारित 'व्हाया सावरगाव खुर्द' हे सुयोग देशपांडे दिग्दर्शित नाटक सादर झाले. (Jalgaon audience appreciated experimental plays in different motifs despite)

'स्टॅण्डअप नाटक' या पद्धतीने ते सादर झाले. गावातील गलिच्छ राजकारण माणसातील आतली प्रवृत्ती यात दाखविताना शिव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होता. दुसरे नाटक टायनी टेल्स निर्मित 'कडेकोट ' हे नाटक सादर झाले.

मुळ 'अ वूमन अलोन' या नाटकाचे अमोल पाटील यांनी मराठी नाट्यरुपांतरण केले होते. कल्पेश समेळ दिग्दर्शित या नाटकात फक्त एकच पात्र होते. प्रतिक्षा खासनीस या महिला कलावंताने रसिकांना एक तास अक्षरशः खिळवून ठेवले. सहजसुंदर अभिनय करताना रसिकांना हसवतच अंतर्मुख करायला लावले. (latest marathi news)

Pratiksha Khasnis performing smooth performance in play 'Kadekot' at Khandesh Theater Festival.
Jalgaon News : वारकरी भवनाचे' मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन : पालकमंत्री पाटील

कडेकोट कडेलोट

"मानवी मनाचे भावबंध आणि नातेसंबधांची गुंतागुंत यांचे सशक्त सादरीकरण आढळले. पुरुषी मानसिकतेतून एका स्त्रीच्या जीवनातील उलथापालथ यथार्थाने मांडली गेली. माणसाचा परिस्थितीला शरण जाण्याच्या आणि बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या स्वभावाचे दर्शन घडले. एकटीने प्रचंड ताकदीने उभ्या केलेल्या व्यक्तीरेखेनिशी प्रेक्षकांना खिळवून ठेवले." - डॉ गिरीश कुलकर्णी नाट्य रसिक, भुसावळ.

Pratiksha Khasnis performing smooth performance in play 'Kadekot' at Khandesh Theater Festival.
CM Shinde Jalgaon Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com