जळगाव : राजकारणात बाळासाहेब ठाकरे किंगमकेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : राजकारणात बाळासाहेब ठाकरे किंगमकेर

जळगाव : राजकारणात बाळासाहेब ठाकरे किंगमकेर

जळगाव (भुसावळ) : महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही नवीन घडले की बाळासाहेब ठाकरे यांची आठवण निघतेच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर! असा प्रश्नही हमखास चर्चेच्या ओघानेच येतो. बाळासाहेब ठाकरे यांचे आक्रमक हिंदुत्व मान्य नसलेले त्यांचे विरोधकही बाळासाहेब आज असायला हवे होते, असे चटकन बोलून जातात. महाराष्ट्राच्या राजकारणावर गप्पांचा फड रंगला आणि बाळासाहेब ठाकरे यांची आठवण निघाली नाही असे होतच नाही असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी केले.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरात सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली अर्पित करण्यात आली. या वेळी ते बोलत होते. नगरसेवक प्रा.डॉ. सुनील नेवे, माजी प्रभारी नगराध्यक्ष सोनी बारसे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, माजी नगराध्यक्ष निळकंठ फालक, संतोष बारसे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनावणे, तालुका संघटक प्रा. धिरज पाटील, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, पुरुषोत्तम नारखेडे, मुकेश पाटील, अमोल इंगळे, गिरीश महाजन, निर्मल दायमा, कैलास लोखंडे, हरीश फालक, नितीन धांडे, सोनी ठाकूर, राकेश खरारे, देवेंद्र पाटील, सुमित बऱ्हाटे, पवन नाले, धनराज ठाकूर, हप्पीसेठ, शरद जोहरे आदी उपस्थित होते.

loading image
go to top