Jalgaon banana on postal Envelope : केळी हे तर खरे कल्पवृक्ष

Jalgaon Banana on Postal Envelop
Jalgaon Banana on Postal Envelopesakal

जळगाव : केळी हेच तर खरे कल्पवृक्ष आहे. जळगाव जिल्ह्याची ओळख केळीचे आगार म्हणून संपूर्ण जगात असणे गौरवाची बाब आहे. जळगावची केळी, नवतंत्रज्ञान, टिश्‍यूकल्चरची केळी भारतात आणि भारताबाहेर प्रसिद्ध पावलेली आहे. याचे सगळे श्रेय जळगावच्या केळी उत्पादक भूमिपुत्रांना जाते. केळी उत्पादकांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे कार्य जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले व ते तंत्रज्ञान सगळ्यांना उपलब्ध करून दिले.

त्यामुळे आज जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्याने पिकविलेली केळी जीआय मानांकन मिळवून विश्वाच्या पटलावर आलेली आहे. येथील केळी उत्पादकांना याचे श्रेय द्यायला हवे म्हणूनच आपण टपाल विभागाबरोबर पाठपुरावा करत केळीचे चित्र व माहिती असलेले पाकिट (इनव्हलप) आज (ता.११) प्रकाशित करीत आहोत, असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.

विश्व टपाल दिनाचे औचित्य साधून जळगाव टपाल विभागाने अशोक जैन यांच्याहस्ते जळगाव केळी यावरील विशेष पोस्टाच्या पाकिटाचे प्रकाशन गांधी उद्यानात सकाळी करण्यात आले. व्यासपीठावर या वेळी ऑल इंडिया बनाना ग्रोवर्स असोसिएशनचे सचिव वसंतराव महाजन, जळगाव टपाल विभागाचे अधीक्षक बी.व्ही. चव्हाण, निसर्गराजा कृषिविज्ञान केंद्र, तांदलवाडीचे अध्यक्ष शशांक पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.(Jalgaon Banana on Postal Envelop

Jalgaon News)

Jalgaon Banana on Postal Envelop
Cyber Crime : अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ; गृहस्थाला मागितली खंडणी

केळीला जागतिक पातळीवर पोचविण्यासाठी, केळीला जीआय मानांकन मिळविण्यात शशांक पाटील यांचे प्रयत्न व जैन टिश्युकल्चरच्या गुणवत्तापूर्ण केळीची मिळालेली जोड आणि त्यास कृषी विभागाचेही मिळालेले सौजन्य या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत जळगाव जिल्ह्याची स्वतंत्र ओळख असलेल्या केळीला पोस्टाच्या पाकिटावर स्थान मिळाले याचा आनंद अशोक जैन यांनी व्यक्त केला.

ऑल इंडिया बनाना ग्रोअर्स असोसिएशनचे सचिव वसंतराव महाजन यांनी सांगितले, की जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांनी केळीमध्ये टिश्युकल्चर तंत्रज्ञान आणून केळीला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. केळी उत्पादक शेतकऱ्यांचा टपाल खात्याचा अगदी जवळचा संबंध असल्याचे त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत स्पष्ट केले. केळीचे जीआय (जिऑग्राफिकल इंडेक्स) मानांकन प्राप्त तांदळवाडी निसर्गराजा कृषिविज्ञान केंद्राचे अध्यक्ष शशांक पाटील यांनी मानांकन मिळविण्यासाठी काय करावे लागले, ते सविस्तर सांगितले. यावेळी जळगाव टपाल विभागाचे अधीक्षक बी. व्ही. चव्हाण यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

हे जळगाव केळीवरील विशेष इनव्हलप गांधी रिसर्च फाऊंडेशनने जैन टिश्युकल्चर यांच्या मदतीने तयार केले आहे. याच्या ४ हजार प्रति करण्यात आल्या आहेत. लवकरच त्या जनसामान्यांसाठी गांधीतीर्थ आणि जळगावच्या टपाल कार्यालयात उपलब्ध होतील. डॉ. आश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले.

Jalgaon Banana on Postal Envelop
कार्यकर्त्यांनो, जनतेच्या प्रश्‍नावर रस्त्यावर उतरा! : Eknath Khadse

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com