Jalgaon News : श्रीराम पाटील ‘डमी’, मग प्रचार कसा करायचा! संतोष चौधरी यांच्यापुढे पेच

Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारीची अपेक्षा बाळगून असलेल्या माजी आमदार संतोष चौधरी यांनी श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांना ‘खडसेंनी दिलेला डमी उमेदवार’ म्हटले.
Santosh Chaudhary
Santosh Chaudharyesakal

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारीची अपेक्षा बाळगून असलेल्या माजी आमदार संतोष चौधरी यांनी श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांना ‘खडसेंनी दिलेला डमी उमेदवार’ म्हटले. (Jalgaon News)

आता शरद पवार यांच्या जामनेर दौऱ्यात चौधरींनी ‘यु टर्न’ घेत प्रचाराचे आश्‍वासन दिले असले, तरी त्यांच्या भुसावळ तालुक्यात डमी उमेदवाराचा प्रचार कसा काय करतांय, असा प्रश्‍न त्यांना विचारला जात आहे. विशेष म्हणजे, शरद पवारांनी चौधरींची समजूत काढत त्यांना प्रचारात सहभागी करून घेतले असले.

तरी त्यांचे भुसावळातील समर्थक व कार्यकर्त्यांच्या पचनी हा विषय पडलेला नाही. ‘संतोषभाऊंवर अन्याय झाल्याची’च भावना व्यक्त करीत अनेक कार्यकर्ते प्रचारापासून दूर असल्याचे बोलले जात आहे.

अजूनही आहे चौधरींचा ‘होल्ड’

रावेर लोकसभा क्षेत्रात सर्वांत महत्त्वाचे शहर व विधानसभा मतदारसंघ म्हणून भुसावळची ओळख आहे. हा मतदारसंघ पुनर्रचनेत राखीव झाल्यामुळे संतोष चौधरी इथले माजी आमदार झाले. आता तीन टर्म झाले ते कुठल्याही पदावर नसले, तरी भुसावळ शहर व तालुक्यात चौधरींचा चांगला ‘होल्ड’ आहे.

एवढेच नव्,हे तर त्यांचे बंधू अनिल चौधरी यांचा रावेर, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातही चांगला संपर्क आहे. त्यामुळे या संपर्क, वर्चस्वाच्याच आधारावर संतोष चौधरी यांनी यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे रावेर लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. (Latest Marathi News)

Santosh Chaudhary
Jalgaon News : महामार्गावर उठतात धुळीचे लोट; पहूरजवळ चौपदरीकरणाचे काम संथगतीने

आधी संकेत, नंतर माघार..

सुरवातीला त्यांना उमेदवारी मिळणार, असे संकेत मिळाले होते. मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह शरद पवारांनी आपल्याला तयारीला लागायच्या सूचना केल्या, असे संतोष चौधरींनी सांगितले व त्यानुसार त्यांचे भुसावळात आगमन झाल्यावर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला. मात्र, नंतर त्यांचे नाव मागे पडले व अखेरीस पवारांनी श्रीराम पाटलांना उमेदवारी घोषित केली.

ही उमेदवार जाहीर झाल्यानंतर चौधरींनी बंडाची भाषा करत, अन्य चार पक्षांकडून ‘ऑफर’ असल्याचे सांगत त्यांच्या समर्थकांच्या जोरावर निवडणूक लढण्याचा ‘निर्धार’ केला. मात्र, गेल्या आठवड्यात शरद पवार जामनेरला येऊन गेले. त्यांनी चौधरींची समजूत काढली व चौधरींनी माघार घेतली.

‘डमी’ उमेदवाराचा शिक्का

मात्र, पाटलांच्या उमेदवारीनंतर चौधरींनी माजी मंत्री एकनाथ खडसेंवर आरोप करतानाच श्रीराम पाटील खडसेंनीच उभे केलेले ‘डमी’ उमेदवार आहेत, असे म्हटले होते. त्यांचे हे वक्तव्य चांगलेच गाजले होते व आजही ते सोशल मीडियावर बऱ्यापैकी व्हायरल होत आहे.

चौधरींनीच पाटलांवर ‘डमी’ उमेदवाराचा शिक्का मारल्यानंतर आता पवारांच्या समजूत काढल्यानंतरही डमी उमेदवाराचा प्रचार कसा करायचा, असा प्रश्‍न चौधरींसमोर आहे. त्यांचे समर्थकच त्यांना हा सवाल विचारत आहेत. भुसावळात त्यांना मानणारा वर्ग याबाबत विचारणा करीत आहे. त्यामुळे चौधरींची गोची होताना दिसतेय.

Santosh Chaudhary
Jalgaon Loksabha: स्मिता वाघांच्या विरोधात ठाकरेंनी मैदानात उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com