Jalgaon News : केळी वेफर व्यवसायातून बारी बंधू झाले आत्मनिर्भर; चांगला नफा मिळत असल्याने दुणावला आत्मविश्‍वास

Jalgaon News : उच्च शिक्षण करूनही नोकरी न मिळाल्याने हताश न होता शहरातील बारी कुटुंबातील तीन भावंडांनी हातगाडीवर केळी वेफर व त्याच्या जोडीला इतर वस्तू विकून कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
Tejas Bari selling banana wafers in the market.
Tejas Bari selling banana wafers in the market.esakal

पारोळा : उच्च शिक्षण करूनही नोकरी न मिळाल्याने हताश न होता शहरातील बारी कुटुंबातील तीन भावंडांनी हातगाडीवर केळी वेफर व त्याच्या जोडीला इतर वस्तू विकून कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यवसायातून आत्मनिर्भर होत एकजुटीने कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. (Jalgaon Bari brothers became self sufficient from banana wafers business)

शहर हे राष्ट्रीय महामार्ग ५३ वर वसले असले तरी येथे औद्योगिक वसाहत नसल्यामुळे बरेच शिक्षित युवक रोजंदारीने कुटुंबाला हातभार लावत आहेत. येथील बाजारपेठ वाय आकाराची आहे. येथे कापड दुकान, किराणा दुकान, फूट‌ वेअर, फळ विक्री व्यवसाय, भाजीपाला विक्री व्यवसाय, बिगारी काम, बांधकाम, कृषी केंद्रे याच ठिकाणी युवक रोजंदारीने काम करतात.

मात्र याला अपवाद ठरत बरेच जण स्वतः आत्मनिर्भर रोजचे ३०० ते ४०० का मिळेना या भावनेतून स्वतः काम करताना दिसतात. त्यातील एक बारी कुटुंब दीपक बारी या युवकाने स्वतः सुरवातीला हातगाडीवर केळी वेफर विकले.

या व्यवसायात समाधानकारक पैसे मिळत असल्यामुळे लहान भाऊ तेजस बारी व नीलेश बारी यांना देखील या व्यवसायात पुढे करून आज तीनही भाऊ एकमताने एकजुटीने शहरातील ग्राहकांना केळी वेफर देऊन ग्राहकांच्या समाधानाबरोबर स्वतःचे कुटुंब सांभाळताना दिसत आहे. (Latest Marathi News)

Tejas Bari selling banana wafers in the market.
Jalgaon News : भाजपला बड्या नेत्यांच्या सभांच हवे ‘कन्फर्मेशन’; मोदी, योगी, गडकरी, स्मृती इराणींच्या सभांचे नियोजन

गेल्या दहा वर्षांपासून बारी परिवार हा व्यवसाय करीत असून, या व्यवसायाच्या माध्यमातून ते कुटुंबाला आत्मनिर्भर करीत आहे. शहरात आज अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. मात्र कुटुंब सांभाळण्यासाठी उच्चशिक्षित होण्याचा कोणताही बडेजाव न करता वडिलांना हातभार लावणारे बरेच युवके आज शहरात दुकानांवर काम करीत आहेत.

दरम्यान, शहरात औद्योगिक वसाहत राहिली असती तर चित्र वेगळे राहिले असते. मात्र ही शोकांतिका कधी दूर होईल व लोकप्रतिनिधींना औद्योगिक वसाहत करण्यासाठी परमेश्वर कधी सदबुद्धी देईल, हे सांगता येणे आज तरी कठीण आहे.

"मध्यमवर्गीय परिस्थिती व व कोणताही वशिला नसल्यामुळे बाहेर गावाहून केळी वेफर आणत हातगाडीवर हा व्यवसाय सुरू केला. भावांना देखील या व्यवसायात गुंतविले. आज समाधानाने या व्यवसायाचा माध्यमातून आई- वडील व भावंडे समाजमनात सुखी समाधानाने वावरत आहेत. व्यवसाय हाच प्रगतीचा राजमार्ग असून, आत्मनिर्भर होण्यासाठी मनाची तयारी असणे गरजेचे आहे." - दीपक बारी, केळी वेफर विक्रेता

Tejas Bari selling banana wafers in the market.
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगावात 20, रावेर मतदारसंघात 29 उमेदवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com