Rohini Nakshatra : रोहिणी नक्षत्राला सुरवात! पावसाची प्रतिक्षा कायम

Rohini Nakshatra : देशभरात हवामान शास्त्र विकसित होण्याआधी खगोलशात्राचा आधार घेऊन सूर्य, चंद्र, ग्रह, तारे याच्या अक्षांश व रेखांशावरून पावसाचा अंदाज पंचांग शास्त्राद्वारे वर्तविला जात आहे.
Rohini Nakshatra
Rohini Nakshatraesakal

Rohini Nakshatra : देशभरात हवामान शास्त्र विकसित होण्याआधी खगोलशात्राचा आधार घेऊन सूर्य, चंद्र, ग्रह, तारे याच्या अक्षांश व रेखांशावरून पावसाचा अंदाज पंचांग शास्त्राद्वारे वर्तविला जात आहे. पंचांग शास्त्रातील नक्षत्रनिहाय हवामान अंदाजातील पहिले पावसाचे नक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्र. या नक्षत्राला सुरवात झाली आहे. पंचांग शास्त्राद्वारे हवामान अंदाज वर्तविण्यात हजारो वर्षांपासूनची एक शास्त्रीय परंपरा आहे. ( Beginning of Rohini Nakshatra from today )

हे एक थोतांड नसून एक शास्त्र आहे. पाऊस येण्याच्या चार महिने आधीच खगोल शास्त्राच्या आधारे त्याचा रोहिणी नक्षत्र अंदाज वर्तविण्याची कला फक्त भारतातच अवगत होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा आजही पंचांग शास्त्राद्वारे वर्तविल्या जाणाऱ्या हवामानावर विश्वास आहे. पंचांग शास्त्र हवामानाचा अंदाज वर्तविताना गणित शास्त्राचाही वापर करण्यात येतो.

गणित शास्त्राचा उपयोग करून सर्व नक्षत्रांची वाहने कोणती हे ठरविल्या जाते. कारण ग्रह, तारे, नक्षत्रासोबत नक्षत्राचे वाहन ही पावसाचे प्रमाण दर्शवण्यास सहायक ठरते. त्यानुसार रोहिणी नक्षत्राचे वाहन उंदीर आहे. सूर्याने २४ मेच्या मध्यरात्री तीन वाजून १६ मिनिटांनी रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला. (latest marathi news)

Rohini Nakshatra
Jalgaon Weather Update : खानदेशात मॉन्सूनचे आगमन 12 जूनच्या पुढेच होणार; आजपासून 3 दिवस वळवाचा पाऊस शक्य

पेरणी योग्य वातावरण नाही

त्यानुसार ग्रह व वाहन या नक्षत्रातील पेरणीयोग्य पावसाला अनुकूल नाहीत. मात्र, नक्षत्राच्या प्रथम चरणात वादळासह पाऊस येण्याची दाट शक्यता दिसून येते. साधारणतः ३० मे ते ५ जूनदरम्यान दुपारनंतर केव्हाही वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, हे पावसाळी वातावरण फार काळ टिकणारे नसेल.

धूळपेरणी न करण्याचे आवाहन

पेरणी योग्य पावसासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. १ जूननंतर उष्णतामान चांगलेच वाढण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी महागाईचा विचार करता धूळपेरणीची घाई करू नये. शेतकऱ्यांनी हवामान शास्त्राचा ताजा अंदाज घेऊन आपल्या भागातील शेती व पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Rohini Nakshatra
Rohini Nakshatra : यंदा 'अशी' राहणार नक्षत्रांची स्थिती; काही नक्षत्रांत चांगला पाऊस, तर काहींकडून हुलकावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com