Jalgaon Crime News : घरफोडीतील संशयित सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Jalgaon Crime : शहरातील महाबळ कॉलनी परिसरातील रहिवासी महापालिका अभियंता जयंत शिरसाठ यांच्या घरफोडीतील संशयित सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
Both thieves caught on CCTV
Both thieves caught on CCTVesakal

Jalgaon Crime News : शहरातील महाबळ कॉलनी परिसरातील रहिवासी महापालिका अभियंता जयंत शिरसाठ यांच्या घरफोडीतील संशयित सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. शेजाऱ्यांनी हटकले असता चोरट्यांनी शेजारील महिलेच्या दिशेने चॉपरची भीती दाखवत धूम ठोकली. हा सगळा प्रकार कैद झाला आहे. (Jalgaon Burglary suspect caught on CCTV camera)

अभियंता जयंत भाईदास शिरसाठ (वय ५५) सोमवार (ता. ४) कुटुंबासह औरंगाबादला जात असताना तासाभरात त्यांच्या शेजारील कविता पाटील यांनी त्यांच्या मोबाईलवर फोल आला की, तुमच्या घराचा दरवाजाचे कडी कोयंडा तुटलेला दिसत असून घरात चोरी झाल्याचे सांगितले.

सीसीटीव्हीत कैद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर असल्याने रस्त्यांवर पोलिसांचा खडा पहारा असताना घडलेल्या या घरफोडीत दोन मास्कधारी संशयित शिरसाठ यांच्या घरात शिरल्याचे दिसल्यावर त्यांनी महिला व तिच्या मुलाने दोघांना हटकले असता, या चोरट्यांनी महिलेच्या अंगावर चॉपरे वार करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने महिला दुर असल्याचे बचावली. दोन्ही चोरटे शेजाऱ्यांच्या सिसीटीव्हीत कैद झाले आहे.

Both thieves caught on CCTV
Nashik Crime News : काजळे खुनप्रकरणातील मुख्य संशयित जेरबंद

भिशीचे पैसे सुरक्षित

चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर दोन कपाटांपैकी एकाच कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले व त्यातील दागिने लंपास केले. दुसऱ्या कपाटात आदल्या दिवशीच लागलेल्या भिशीचे ३५ हजार रुपये ठेवलेले होते. सुदैवाने चोरट्यांनी ते कपाट पाहिले नाही, त्यामुळे ही रक्कम सुरक्षित राहिली.

Both thieves caught on CCTV
Bhor Crime News : भोरला विक्रीसाठी आणलेला साडेचार किलो गांजा पकडला; तरुणास अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com