Jalgaon Assembly Constituency : ‘प्रीलीम’ तर पास, आमदारांची ‘मेन्स’ अद्याप बाकी; विधानसभेला लागणार कसोटी

Assembly Constituency : जळगाव लोकसभा क्षेत्रातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघांतून भाजप- महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले.
Assembly Constituency
Assembly Constituency esakal

Jalgaon Assembly Constituency : लोकसभा निवडणुकीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा क्षेत्रातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघांतून भाजप- महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे महायुतीच्या आमदारांना हायसे वाटणे स्वाभाविक आहे. ही निवडणूक त्यांच्यासाठी ‘प्रीलीम’ होती, त्यात ते उत्तीर्ण झाले. मात्र, विधानसभेची ‘मेन्स’ म्हणजे मुख्य परीक्षा बाकी असून, त्यातच खरी कसोटी लागणार आहे. (Candidates of BJP Mahayuti won votes in 11 assembly constituencies of Lok Sabha)

लोकसभा निवडणुकीचा धुराळा आतापर्यंत बऱ्यापैकी शांत झालांय. तरीही कोणत्या मतदारसंघातील, कुठल्या गावातून, कुठल्या केंद्रावर, कोणत्या उमेदवाराला किती लीड आहे, याबाबत गावोगावी चर्चा रंगू लागल्या आहेत. आणखी काही दिवस चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच राहील. मात्र, या निवडणुकीत दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रातील महायुतीचे सर्वच आमदार भाजप उमेदवारांना मताधिक्य देण्यात यशस्वी ठरले आहेत.

जळगाव लोकसभा

जळगाव मतदारसंघात भाजप आमदार राजूमामा भोळे असून, स्मिता वाघ यांना ६१,७१६ मतांचे मताधिक्य आहे. शहरात गेल्या दोन टर्मपासून राजूमामा आमदार आहेत. आता तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक असून, पक्षांतर्गत व विरोधी पक्षातही त्यांचे अनेक स्पर्धक असले, तरी श्री. भोळे यांचे पारडे बऱ्यापैकी जड दिसून येतेय. बाजूच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात पालकमंत्र्यांनी त्यांना साजेशी कामगिरी करत स्मिता वाघ यांना ६३,१४० मतांचे मताधिक्य दिले.

सध्या तरी त्यांच्यासमोर कुणीही सक्षम विरोधक दिसत नाही. अमळनेर ‘होमटाऊन’ असल्याने स्मिता वाघ यांना भरभरून ७१ हजारांचा लीड मिळाला. मंत्री अनिल भाईदास पाटलांना तो विधानसभेला टिकवून ठेवावा लागेल. अर्थात, अमळनेरच्या जागेसाठी अनेक इच्छुकांची स्पर्धा असेल. एरंडोल मतदारसंघात आमदार चिमणराव पाटलांनी मुलगा अमोलच्या मदतीने स्मिता वाघांना २२०८५ मतांचे मताधिक्य दिले. (latest marathi news)

Assembly Constituency
Nandurbar Assembly Constituency : विधानसभेतील वैराचे, लोकसभेत मैत्रीत रूपांतर!

लोकसभेला काही अडचण नसते, पण मतदारसंघात विधानसभेला चुरस असते. मित्रपक्षासह विरोधी गटांतही चिमणरावांचे स्पर्धक बरेच आहेत. चाळीसगावला अवघा १६,३२७ मतांचा लीड आमदार मंगेश चव्हाण यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकेल. खरेतर, चव्हाणांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे सर्वाधिक मताधिक्य चाळीसगावमधून अपेक्षित असताना, हा मतदारसंघ मागे राहिल्यामुळे विधानसभेसाठी उन्मेष पाटील चव्हाणांना त्रासदायक ठरू शकतील.

पाचोरा मतदारसंघातही १६,५६८ मतांचे मताधिक्य असल्याने आमदार किशोर पाटील यांच्या चिंतेत भर पडली आहे. अर्थात, याठिकाणी उन्मेश पाटलांचा भाजपतील मित्र परिवारही मोठा असल्याने त्यांचा छुपा पाठिंबा करण पवारांना मिळाला असेल. तरीही किशोरअप्पांसमोर कुटुंबातीलच त्यांच्या भगिनी सक्षम उमेदवार म्हणून समोर येत असल्याने मोठे आव्हान असेल.

रावेर लोकसभा

रावेर लोकसभा मतदारसंघातूनही प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून रक्षा खडसेंना मताधिक्य मिळाले आहे. अपेक्षेप्रमाणे चोपडा मतदारसंघाने सर्वाधिक ६३,६४२ मतांचे मताधिक्य खडसेंना दिले. याठिकाणी अंतिम टप्प्यात आमदार लता सोनवणेंसह त्यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे सक्रिय झाले. हा मतदारसंघ नेहमीच लोकसभेला भाजपसोबत राहिला आहे. यंदा लीड कमी राहील, असे मानले जात असताना, चोपड्याने सर्वाधिक मताधिक्य दिले.

Assembly Constituency
Deola-Chandwad Assembly Constituency : चांदवडमध्ये भाजपला फटका; महाविकास आघाडीची सरशी !

रावेर श्रीराम पाटलांचे ‘होमटाऊन’ तरीही ते ३५,७३१ मतांनी मागे राहिले. पाटलांना ज्यांच्या शिफारसीने राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली ते आमदार शिरीष चौधरी याठिकाणी अपयशी ठरले. विधानसभेला चौधरींसाठी ही धोक्याची घंटा आहे. भुसावळ मतदारसंघाने दरवेळेप्रमाणे रक्षा खडसेंना चांगला म्हणजे ४१४६० मतांचा लीड दिला. माजी आमदार संतोष चौधरी याठिकाणी निष्प्रभ ठरले.

आमदार संजय सावकारेंसह त्यांच्या टीमने भुसावळला चांगले काम केल्याचा परिणाम दिसून आला. जामनेर मतदारसंघ भाजपचा गड आहे. मराठा बहुल असूनही जामनेरने गिरीश महाजनांसारख्या अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यास सलग सहावेळा निवडून दिले. त्यामुळे जामनेरातून रक्षा खडसेंना लीड अपेक्षितच होता. तो मंत्री महाजनांच्या प्रतिष्ठेला साजेसा नाही, एवढेच. तरीही ३६६८० ही मोठी संख्या आहे. खडसेंच्या मुक्ताईनगरातून रक्षा यांना ४६९२९ मताधिक्य मिळाले.

स्वत: एकनाथ खडसे मैदानात उतरलेले, शेवटी आमदार चंद्रकांत पाटलांच्या मदतीमुळे मुक्ताईनगरातून मोठे मताधिक्य मिळू शकेल. मात्र, आता विधानसभेला चंद्रकांत पाटलांसाठी रक्षा यांच्यासह एकनाथ खडसेंनाही प्रचारात उतरावे लागेल. अगदी रोहिणी खडसे प्रतिस्पर्धी उमेदवार असल्या तरी. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघात रक्षा खडसेंनी ४७०८६ मतांची आघाडी घेतली. याठिकाणचे कॉंग्रेसचे आमदार राजेश एकडे निष्प्रभ ठरले. आता त्यांच्यासमोर विधानसभेला भाजपच्या चैनसुख संचेतींचे आव्हान मोठे असणार आहे.

Assembly Constituency
Nashik Deolali Assembly Constituency : चौरंगी लढतीमुळे मराठा मतांचे विभाजन

पुढे मोठी कसोटी

एकूणच विधानसभा क्षेत्रनिहाय मताधिक्यांचा विचार करता महायुतीचे सर्वच आमदार या पूर्वपरीक्षेत यशस्वी झाले, चांगल्या गुणांनी यश मिळविले. मात्र, लोकसभेला केंद्रातील नेतृत्वाकडे पाहून मतदान केले जाते. राज्याराज्याची निवडणूक वेगळी असते. त्यामुळे आपल्या विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले, म्हणून आपणच पुढचे आमदार, असे समजण्याचे कारण नाही. विधानसभा निवडणूक मुख्य परीक्षा मानली, तरी ती तीन महिन्यांनी येतेच आहे. त्यात सर्वांची कसोटी लागणार आहे.

काय असतील आव्हाने

-राज्याचे प्रश्‍न व निवडणूकही वेगळी असते

-शिवसेना आमदारांना ‘गद्दारा’चा शिक्का पुसावा लागेल

-महाविकास आघाडीचे मनोबल वाढलेय

-पक्षांतर्गत, मित्रपक्षातील इच्छुकांची गर्दी

-नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी लागणार कसब

-बंडखोरीचे प्रमाण अधिक असेल, ते मोडून काढणे

Assembly Constituency
Jalgaon Assembly Constituency : जळगाव जिल्ह्यात विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या ठरणार डोकेदुखी; आतापासूनच ‘फिल्डिंग’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com