State Children Drama : जळगाव केंद्रातून ‘हालगी सम्राट’ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Drama Competition

State Drama Competition : जळगाव केंद्रातून ‘हालगी सम्राट’ प्रथम

जळगाव : येथील केंद्रावर नुकत्याच पार पडलेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत आर. आर. विद्यालयाच्या ‘हालगी सम्राट’ या नाटकाने प्रथम पारितोषिक प्राप्त करत बाजी मारली. भुसावळच्या अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या ‘चम चम चमको’ नाटकास द्वितीय बक्षीस मिळाले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर केला असून, त्याद्वारे आता या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. (Jalgaon Centre Halgi Samrat first State Children Drama Competition Results Jalgaon News)

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Nashik News : मार्चमध्ये रामवाडी पूल दरम्यान नदीपात्रात Boating! दोन्ही बाजूला जेट्टी तयार

स्पर्धेचा निकाल असा

दिग्दर्शन : प्रथम- दीपक वाघ (नाटक : हालगी सम्राट), द्वितीय- सोनाली वासकर (चम चम चमको)

प्रकाशयोजना : प्रथम- प्रांजल पंडित (राक्षस), द्वितीय- भावेश पाटील (क ला काना का)

नेपथ्य : प्रथम- अरविंद बडगुजर (ढ नावाची आधुनिकता), द्वितीय- अनिरुद्ध किरकिरे (किंमत एका झाडाची)

रंगभूषा : प्रथम- पंकज साखरे (खेळण्याची करामत), द्वितीय- वंदना वाणी (लिव्ह मी)

उत्कृष्ट अभिनय (रौप्यपदक) : प्रणीत जाधव (हालगी सम्राट), पीयूषा महाजन (चम चम चमको)

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र : गायत्री भोसले (चम चम चमको), भूमिका गावडे (मरी गई), वैष्णवी भोई (मरी गई), अथर्व पाटील (हालगी सम्राट), आदित्य पाटील (खेळण्याची करामत), पीयूष बालाजीवाले (वारी), आदित्य काळे (बटर फ्लाइज), पवनदीप पवार (ढगाला लागली कळ).

हेही वाचा: Nashik News | वायुप्रदुषण नियंत्रणासाठी हवी नागरिकांची साथ : NMC आयुक्‍त डॉ.पुलकुंडवार