child abuse cases in Jalgaon district
esakal
जळगाव : जिल्ह्यात गेल्या २८ महिन्यांत ४६ मुली आणि चार अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचे गुन्हे दाखल झाले (child abuse cases in Jalgaon district) आहेत. दाखल गुन्ह्यांमध्ये गंभीर बाब म्हणजे या पीडित बालकांचे लचके तोडणारे दूरचे कुणी नाही तर बहुतांश परिचित असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.