जळगाव : आकाशवाणी चौकातील सर्कलचे काम बंद पाडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : आकाशवाणी चौकातील सर्कलचे काम बंद पाडले

जळगाव : आकाशवाणी चौकातील सर्कलचे काम बंद पाडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामात आकाशवाणी चौकात सुरू असलेले रोटरी सर्कलचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून बंद पाडले. पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत घातल्यानंतर ते बाजूला झाले व काम सुरू करण्यात आले.

शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्याअंतर्गत आकाशवाणी चौकासह इच्छादेवी चौक व अजिंठा चौकात रोटरी सर्कल बनविण्यात येणार आहे. पैकी आकाशवाणी चौकात सर्कलचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, चौकाच्या एकूणच आकाराच्या तुलनेत सर्कलचा व्यास खूप जास्त असल्याने त्यास विरोध होत आहे. शिवाय हे सर्कल तांत्रिकदृष्ट्य़ा योग्य नसल्याचा दावाही शिरीष बर्वे व अन्य तज्ज्ञांनी केला आहे.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुपारी अकराच्या सुमारास आकाशवाणी चौकात आंदोलन सुरू केले. कामाच्या तांत्रिक त्रुटींबाबत घोषणाबाजी करत त्यांनी काम बंद पाडले. या वेळी चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. काही वेळ वाहतुकीचा खोळंबाही झाला होता.

जिल्हापेठ ठाण्याचे निरीक्षक व अन्य पोलिस कर्मचारी आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली. काम बंद पाडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर आंदोलन केल्याचा काय उपयोग? असा प्रश्‍न उपस्थित करत कार्यकर्ते भूमिकेवर ठाम राहिले. मात्र, काही वेळानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

loading image
go to top