Jalgaon News : पारोळ्यात टोल विरोधात नागरिकांचा एल्गार; अन्यायकारक टोल दरा विरोधात स्थानकांचा आंदोलनाचा इशारा

Jalgaon : राष्ट्रीय महामार्ग ५३ वर सबगव्हाण गावाजवळ आज पासून सुरू होणाऱ्या टोल बाबत पारोळा स्थानिक नागरिकांनी एकजूट दाखवत प्रशासनास निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला.
While giving a statement to Tehsildar Dr. Ulhas Deore Police Inspector Sunil Pawar, former Mayor Chandrakant Patil.
While giving a statement to Tehsildar Dr. Ulhas Deore Police Inspector Sunil Pawar, former Mayor Chandrakant Patil. esakal

Jalgaon News : येथील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर सबगव्हाण गावाजवळ आज पासून सुरू होणाऱ्या टोल बाबत पारोळा स्थानिक नागरिकांनी एकजूट दाखवत प्रशासनास निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला.

पारोळा तालुक्यातील व्यापारी महासंघ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवेदन देण्यात आले. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, जि प सदस्य रोहन पवार, ॲड तुषार पाटील. (Jalgaon Citizens protest against toll in Parole)

दीपक अनुष्ठान, डॉ शांताराम पाटील, बाजार समिती संचालक मनोराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहर पवार गटाचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ शांताराम पाटील, शहराध्यक्ष महेश पाटील , छावा संघटना तालुका अध्यक्ष विजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते, गणेश पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय.

शशिकांत साळुंखे,अशोक ललवाणी , प्रा जे बी पाटील कपिल चौधरी रवि जाधव लोकेश पवार वना महाजन ललित सोनवणे,सुवर्णा पाटील,जयश्री साळी ,स्वाती शिंदे ,किशोर पाटील सुनील देवरे यावेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र होउन आज तहसिलदार उल्हास देवरे,पो नि सुनील पवार यांना देत विरोध दर्शविला.

स्थानिकांवर अन्याय

योगेंद्र पवार यांनी सांगितले की, सकाळी आठपासून टोल आकारणी सुरू होणार आहे. यात ट्रक , बस ३६५ रुपये, हलके वाणिज्य वाहने मालवाहू वाहने १७५ ते २६० रूपये, कार,प्रवासी वाहनांना ११० ते १६० तर तीन एक्सल वाहने ४०० ते६०० बांधकामसाठी नेणाऱ्या वाहनांना ५७५ ते ८०० तर मोठ्या वाहनांना ७०० ते १०५० रूपये मोजावे लागणार आहे.

While giving a statement to Tehsildar Dr. Ulhas Deore Police Inspector Sunil Pawar, former Mayor Chandrakant Patil.
Jalgaon News : जिल्हा शिक्षक पतपेढीची होणार चौकशी; वसतिगृह, अन्य प्रकरणात गैरव्यवहार

२० किमी अंतरावर असलेल्या वाहनांना मासिक पास ३३० रूपये आहे. रोज ये जा करणाऱ्या व नियमित न जाणाऱ्या वाहनांना एकच नियम लावले जात असून या बाबत नागरिकांत नाराजी आहे. टोल प्राधिकरणाने ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून स्थानिक वाहन धारकासाठी नवी नियमावली करावी. महामार्ग अपूर्ण आहे.

समस्या तशाच..

अजून उद्घाटन झालेले नाही. पथदिप , दिशा दर्शक फलक, कॅटल गार्ड, फूट पाथ,गटारी, स्वच्छता गृह, रुग्णवाहिका,अपघात होऊ नये यासाठी गती रोधक,झेब्रा क्रॉसिंग केले नाहीत. पारोळा शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर रस्ते दुभाजक, जुना महामार्ग दुरुस्ती या प्रकारचे अनेक कामे अजून करावयाचे बाकी आहे.

सर्व कामे पूर्ण झाल्यावर वीस किलोमीटर अंतर्गत सर्व स्थानिक लाभार्थ्यांना खासगी वाहनांसाठी वीस रुपयांप्रमाणे टोल आकारणी करावी. अन्यथा त्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

While giving a statement to Tehsildar Dr. Ulhas Deore Police Inspector Sunil Pawar, former Mayor Chandrakant Patil.
Jalgaon News : मुक्ताईनगर तालुक्यातून महामार्ग नेण्यास विरोध; अंतुर्लीच्या शेतकऱ्यांची भूमिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com