
Clash between two groups in Jalgaons Paladhi village : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी आणि कुटुंबियांना घेऊन जाणाऱ्या कारने धक्का दिल्याने जळगावच्या पाळधी गावात मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. यावेळी दोन गटात तुफान हाणामारी झाली. तसेच गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. नववर्षांच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर आता पाळधी गावात तणावपूर्ण शांतता असल्याचं सांगण्यात येत आहे.