Jalgaon News : जळगाव जिल्हा शिक्षण विभागातील थकीत बिलांचा मार्ग मोकळा

सन २०१९ पासून ते आजपर्यंत जिल्हा शिक्षण विभागातील थकीत बिलांचा मार्ग मोकळा झाला असून, यासाठी जिल्ह्यासाठी १३२ कोटी अनुदान प्राप्त झाले असल्याची माहिती शिक्षक नेते संभाजी पाटील यांनी दिली आहे.
Pending Bills
Pending Bills esakal

Jalgaon News : सन २०१९ पासून ते आजपर्यंत जिल्हा शिक्षण विभागातील थकीत बिलांचा मार्ग मोकळा झाला असून, यासाठी जिल्ह्यासाठी १३२ कोटी अनुदान प्राप्त झाले असल्याची माहिती शिक्षक नेते संभाजी पाटील यांनी दिली आहे तर थकित बिले ऑनलाइन सादर करावीत, या प्रश्नी शिक्षक आमदार किशोर दराडे व संभाजी पाटील यांनी पुणे शिक्षण संचालक यांच्याशी पाठपुरावा करून ही बिले मोकळी करण्याचा मार्ग सुनिश्चित केला आहे. (Jalgaon Clear way for outstanding bills in District Education Department)

यामध्ये वेतन फरकातील पुरवणी बिले, वैद्यकीय देयकांची बिले, वरिष्ठ श्रेणी फरक बिले, अर्जित रजे संदर्भातील बिले, अशी विविध प्रकारची शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बिले २०१९ पासून प्रलंबित होती. या प्रश्नावर संभाजी पाटील यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

काही दिवसांपूर्वी पुणे येथील शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी तथा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून मागणी लावून धरली. (latest marathi news)

Pending Bills
Jalgaon Lok Sabha Election : ‘रावेर’च्या मैदानात खडसेंविरुद्ध डॉ. पाटील यांची तयारी

त्याचाच परिणाम म्हणून २०१९ पासून ते २०२४ पर्यंतची प्रलंबित थकीत बिले आता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

ऑनलाइन बिले सादर करावीत

२०१९ पासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयामार्फत ऑफलाइन बिले सादर केले असतील तरी हीच बिले आपापल्या शालेय आस्थापनेतील टॅबमधून जळगाव जिल्हा वेतन पथकाकडे ऑनलाइन सादर करावीत.

Pending Bills
Jalgaon Lok Sabha Election : भाजपचा बालेकिल्ला फोडण्याचे शिवसेना ठाकरे गटासमोर आव्हान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com