जळगाव : कोळसा टंचाईमुळे वाढले बांधकाम साहित्याचे दर

प्रक्रिया उद्योगांना मोठा फटका; कच्चा मालही झाला महाग
कोळसा
कोळसाsakal

जळगाव : देशभरात कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाल्याने एकीकडे वीजनिर्मिती प्रकल्प बंद पडत आहेत, तर दुसरीकडे कच्च्या मालाची कमतरता व कोळसा टंचाईने प्रक्रिया उद्योग पूर्ण क्षमतेने चालू शकत नसल्याने बांधकाम साहित्याचे दर वाढले आहेत. उत्पादन कमी, मागणीत वाढ त्यामुळे पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याने स्टील, सिमेंट या प्रमुख घटकांसह अन्य सर्वच साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत.

नोटाबंदीच्या फटक्यानंतर दरवर्षी सातत्याने नवीन संकट आल्यामुळे अडचणीत आलेल्या बांधकाम व पायाभूत सुविधांच्या क्षेत्राला सातत्याने एका नव्या समस्येला सामोरे जावे लागतेय. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले आणि रिअल इस्टेट क्षेत्र सर्वाधिक प्रभावित झाले. त्यानंतरही या क्षेत्रासमोरील आव्हानांची मालिका संपायला तयार नाही. सिमेंट व स्टीलच्या काळ्या बाजार व साठेबाजीचा एकूणच या क्षेत्रावर मोठा परिणाम होऊन बांधकामाची एकूण किंमत वाढली. त्यावर ‘सकाळ’ने बुधवारच्या अंकात प्रकाशझोत टाकला.

कोळसा
IND vs PAK: पार्थिवने निवडलं Playing XI, जाणून घ्या संघ!

कोळसाटंचाईचाही फटका

सोबतच आता देशभरात निर्माण झालेली कोळसा टंचाईही बांधकामासाठी आवश्‍यक साहित्याचे दरवाढीला कारणीभूत ठरली आहे. सिमेंट ज्या फ्लाय ॲशमुळे तयार होते, ती राखच कोळसा पुरेसा नसल्याने उपलब्ध होत नाही, त्यामुळे सिमेंट उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. स्टील वा अन्य साहित्य उत्पादन होत असलेल्या कंपन्यांमध्ये इंधन म्हणून कोळशचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, तो पुरेसा उपलब्ध नसल्याने हे उद्योग पूर्ण क्षमतेने चालविणे कठीण जात आहे.

वीजनिर्मितीवरील परिणाम

कोळसा टंचाईचा फटका वीज निर्मिती प्रकल्पांनाही बसला आहे, त्यामुळे देशभरात व राज्यावरही भारनियमनाचे संकट आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ व राज्यातही वरिष्ठ स्तरावर त्यासाठी हालचाली सुरु आहेत. मात्र, सध्यातरी वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने होऊ शकत नसल्याने सामान्य ग्राहकांवर बोजा न टाकता उद्योगांची वीज कपात केल्यामुळे सर्वच प्रकारच्या उद्योगांना फटका बसला आहे.

कोळसा
गडकरींचं निवासस्थान हक्काचं, भेटीनंतर विनायक राऊतांची प्रतिक्रिया

चायनाचा माल नाही

विविध उत्पादनांच्या कच्च्या मालासाठी भारताला बर्याच अंशी चीनवर अवलंबून राहावे लागते. सध्या भारत- चीन सीमेवरील तणावामुळे उभय देशांतील संबंध ताणले गेले आहेत. त्याचा परिणाम कच्च्या मालासह अन्य वस्तूंच्या आयात, निर्यातीवर झाला आहे. त्यामुळे कच्चा माल पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यानेही बांधकाम साहित्याचे उद्योग अडचणीत आहेत. परिणामी, जास्त रक्कम मोजूनही माल मिळत नसल्याने या क्षेत्रासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com