Jalgaon News : कार रेस लावणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Jalgaon : जिल्ह्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी जनजागृतीबरोबर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
Collector Ayush Prasad speaking in the District Road Safety Committee meeting. Neighbor Officer.
Collector Ayush Prasad speaking in the District Road Safety Committee meeting. Neighbor Officer.esakal

Jalgaon News : जिल्ह्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी जनजागृतीबरोबर उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बायपास रस्ता तत्काळ व्हावा, म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. शहरातील वाढती गर्दी, सिमेंटचे रस्ते आणि नवतरुणांच्या गाड्यांचे वाढते वेगावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस आणि आरटीओ एकत्रित प्रयत्न करतील, असे सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. ( case will be filed against those who organize car races )

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, राज्य परिवहन मंडळाचे वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, राष्ट्रीय महामार्गचे अभियंता सुनील गजरे, बांधकाम विभागाचे अभियंता आर. व्ही. बिऱ्हाडे यांच्यासह विविध वाहतूक संघटना, स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

महामार्गावर मुख्य चौकात सिग्नल यंत्रणा

शहरातील वाढती गरज लक्षात घेऊन योग्य ते वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका, पोलिस, आरटीओ यांनी समन्वयाने जिथे गरज असेल, तिथे वाहतूक सुरक्षासंदर्भात उपाययोजना कराव्यात. बाहेर येणारी जड वाहतूक बायपासचे काम होत नाही, तोपर्यंत सुरु राहील. येत्या काही महिन्यांत ते काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन पाठपुरावा करेल. एकदा बायपासचे काम पूर्ण झाले, की मुख्य रस्त्यावर सिग्नल यंत्रणा बसविण्याबरोबर ज्या ज्या गोष्टी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेच्या आहेत, त्या केल्या जातील, असे सांगण्यात आले. (latest marathi news)

Collector Ayush Prasad speaking in the District Road Safety Committee meeting. Neighbor Officer.
Jalgaon News : पारोळा बसस्थानक बनले वाहनतळही; चालकवाहकांसह प्रवाशांनाही त्रास

जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्मेट अनिवार्य

नागरिकांना दुचाकी चालवताना डोक्याची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते. आता शहरात सगळीकडे सिमेंटचे रस्ते झाल्यामुळे गाड्यांचे वेग वाढतायत, कमी वेगाने गाड्या चालविण्याची संस्कृती रूळविण्यासाठी सुरवातीला वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना देऊन लोकांना हेल्मेटची सवय लागावी, म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात येताना दुचाकीचालकांना हेल्मेट अनिवार्य करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

वाहतूक नियंत्रणासाठी वॉर्डन देणार

वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत म्हणून रेडक्रॉस सोसायटीकडून वॉर्डन देणार असल्याची घोषणा रेडक्रॉस सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. महामार्गावर दुभाजक काहीजण आपल्या सोयीसाठी तोडण्याचे काम करताहेत. हे अपघाताला निमंत्रण असून, असे करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी लोही यांनी जिल्ह्यातील रस्ता सुरक्षिततेबाबत सादरीकरण केले. त्यात जिल्ह्यातील तीन ब्लँक स्पॉटवर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वते उपाययोजना झाल्या असून जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्र शोधले असून येत्या काही महिन्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Collector Ayush Prasad speaking in the District Road Safety Committee meeting. Neighbor Officer.
Jalgaon News : इतिहासाची साक्ष देणाऱ्या पीर दरवाज्याची वाताहत; पारोळाकरांमधून नाराजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com